कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा प्रियकर हर्ष लिंबाचिया हे दोघे येत्या डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच भारतीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली होती. भारती आणि हर्ष सध्या लग्नाच्या खरेदीत खूप बिझी आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला भारतीच्या लग्नाचा ड्रेस डिझाइन करणार आहे.
नीता लुल्लाने भारतीच्या लग्नासाठी नारंगी रंगाचा अनारकली पॅटर्नमध्ये ड्रेस डिझाइन केला आहे. नीताने याआधी ऐश्वर्या- अभिषेक बच्चन, ईशा देओल- भारत तख्तानी, ईशा कोपीकर- टिमी नारंग, रितेश देशमुख- जेनेलिया डिसूझा यांच्या लग्नाचेही ड्रेस डिझाइन केले आहेत. ‘भारतीच्या ड्रेससाठी मी फ्युजन थीमची निवड केली आहे. लग्नासाठी नारंगी रंगाचा नेटचा अनारकली ड्रेस डिझाइन केला आहे, ज्यावर अत्यंत बारीक एम्ब्रॉयडरी असेल. तर रिसेप्शनसाठी निळ्या रंगाचा डायमंड एम्ब्रॉयडरी असलेला गाऊन डिझाइन केल्याचे नीताने सांगितलं.
वाचा : माहिरा खानने जाणूनबुजून मोडले विमानातील नियम
नीताकडून ड्रेस डिझाइन करण्यासंदर्भात भारती म्हणाली की, ‘मला त्यांनी डिझाइन केलेले कपडे खूप आवडतात आणि त्यांच्या कामावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या दिवसासाठी ती सर्वोत्तम ड्रेस डिझाइन करेल, याची मला खात्री आहे.’
भारती आणि हर्ष याचे लग्न ३ डिसेंबरला आहे. त्यामुळे भारतीने दोन महिन्यांची सुट्टी घेतली असून लग्नाच्या तयारीकडे लक्ष देत आहे. गोव्यात हा लग्नसोहळा पार पडणार असून विवाहस्थळाची सजावटीसाठी गोवन थीममध्ये निवडण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 4, 2017 7:03 pm