News Flash

Video: स्टॅण्डअप कॉमेडियन स्टेजवरच कोसळला; चाचणीत करोना पॉझिटिव्ह निघाला

प्रेक्षकांना हसवणारा विनोदवीर स्टेजवरुन थेट रुग्णालयात पोहोचला

करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत जगभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीचे नाव जोडले गेले आहे. प्रसिद्ध विनोदवीर डी एल ह्यूगले याला करोना विषाणूची लागण झाली आहे. एका कार्यक्रमादरम्यान अचानक ह्यूगलेला चक्कर आली. त्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात भरती केले गेले. या उपचारादरम्यान त्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

एका कॉमेडी नाईट क्लबमध्ये ह्यूगले स्टेजवर परफॉर्म करत होता. त्याचवेळी अचानक त्याला चक्कर आली. खाली पडलेल्या ह्युगलेला त्वरीत उपचारासाठी रुग्णालयात भरती केले गेले. यावेळी त्याची करोना चाचणी देखील केली गेली. धक्कादायक बाब म्हणजे या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ह्यूगलेच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती आता स्थिर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 2:27 pm

Web Title: comedian d l hughley collapses on stage later tests positive for coronavirus mppg 94
Next Stories
1 ‘हाफ गर्लफ्रेंड’साठी आधी सुशांतची झाली होती निवड?; चेतन भगत यांचा ट्विट होतोय व्हायरल
2 करोनामुक्तीनंतर न्यूझीलंडमध्ये सर्वात आधी प्रदर्शित होणार अजय देवगणचा ‘हा’ चित्रपट
3 “उद्या तुमच्या मुलांना इंडस्ट्रीत येऊ देणार नाही का?”; घराणेशाहीवर टीका करणाऱ्यांना सोनी राजदान यांचा सवाल
Just Now!
X