23 November 2017

News Flash

पुढच्या महिन्यात ‘द कपिल शर्मा शो’चं दणक्यात कमबॅक?

कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी तो फारच उत्सुक आहे.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 5:35 PM

कपिल शर्मा

कॉमेडियन कपिल शर्माने काही दिवसांपूर्वीच त्याचा लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांची निराशा झाली. प्रदीर्घ काळासाठी आपला लाडका विनोदवीर टेलिव्हिजन विश्वापासून दूर जाणार असा विचारही चाहत्यांनी केला नव्हता. खुद्द कपिलनेही त्याच्या मनावर दगड ठेवूनच हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. त्याचा कार्यक्रम ‘ऑफ एअर’ गेला खरा, पण तेव्हापासूनच तो कधी परतणार हा एकच प्रश्न विचारला जाऊ लागला. हेच वातावरण आणि प्रेक्षकांचं प्रेम पाहत कपिलने लवकरच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचा निर्णय घेतला आहे.

रक्तदाब आणि तणावामुळे कपिलची तब्बेत बरेच दिवसांपासून ठिक नव्हती त्यामुळेच त्याने स्वत:साठी वेळ देण्याचा निर्णय घेत बंगळुरूमध्ये योग्य ते उपचार घेतले. आता त्याची प्रकृती पूर्णपणे सुधारली आहे. कपिलशी संबंधित काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्याची प्रकृती उत्तम असून, आपल्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी तो फारच उत्सुक आहे.

“कपिल आता पूर्णपणे बरा असून, बंगळुरू येथून तो लवकरच परतणार आहे. परतल्यानंतर तो पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करेल आणि पुढच्या महिन्यात ‘द कपिल शर्मा शो’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज असेल’, अशीही माहिती सूत्रांनी दिली. कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून सुट्टी घेण्याआधी कपिलने त्याच्या आगामी ‘फिरंगी’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं असून, १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा : कपिल शर्माचा प्रेयसीसोबत ब्रेकअप?

एकिकडे या विनोदवीराच्या आयुष्यात आनंददायी गोष्टी घडत असतानाच त्याच्या खासगी आयुष्यात मात्र मीठाचा खडा पडला आहे. प्रेयसी गिन्नी छत्राथ हिच्यासोबत कपिलचा ब्रेकअप झाला असून, त्यांच्या नात्यात कायमचा दुरावा आल्याचं म्हटलं जातंय.

First Published on September 14, 2017 5:31 pm

Web Title: comedian kapil sharma is fit doing well and resume the kapil sharma show shoot next month