News Flash

अखेर कपिल शर्माने बाळचं नाव सांगितलं; मुलाचं नाव आहे…

ट्विटरवरून कपिलने मुलाचं नाव केलं जाहीर

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना पोटभोर हसवणाऱ्या कपिल शर्माचे अनेक चाहते आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच कपिल दुसऱ्यांदा वडील झाला आहे. फेब्रुवारीमध्ये कपिलची पत्नी गिन्नी हिने एका मुलाला जन्म दिला. कपिलने सोशल मीडियावरून ही बातमी शेअर करताच चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. कपिलने चाहत्यांचे आभारही मानले होते. मात्र कपिलने त्याच्या बाळाचं नाव काय ठेवलं हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते.

कपिल शर्माने अखेर त्याच्या बाळाचं नाव काय ठेवलंय़ हे आता चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. गायिका नीति मोहन हिच्या एका ट्विटला उत्तर देताना कपिलने त्याच्या बाळाचं नाव सांगितलं आहे. कपिल शर्माने त्याच्या बाळाचं नाव त्रिशान ठेवलं आहे.

2 एप्रिलला कपिल शर्माचा वाढदिवस होता. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी आणि कपिलच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यात गायिका नीति मोहन हिने ट्विटरवरून कपिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ” हॅपी बर्थडे डियर कपिल पाजी. तुला आणि तुझ्या कुटुंबियांसाठी खूप सारं प्रेम. आता तरी मुलाचं नाव सांगा.” असं ट्विट तिने केलं होतं.

नीति मोहनच्या या ट्विटला उत्तर देताना कपिल म्हणाला, ” धन्यवाद नीति आशा आहे तू तुझी काळजी घेत असशील. आम्ही मुलाचं नाव त्रिशान ठेवलं आहे.”

यावर नीतिने कपिलला बाळाचं नाव सुंदर असल्याचं म्हंटलं आहे. ” त्रिशान कपिल शर्मा, मस्त वाटतं, देवाचे आशिर्वाद कायम त्यात्यावर राहो.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

2018 सालात कपिल शर्मा आणि गिन्नी विवाह बंधनात अडकले होते. त्यानंतर 10 डिसेंबरला कपिल आणि गिन्नीच्या आयुष्यात पहिली पाहुणी आली. कपिलने त्याच्या मुलीचं नाव अनायरा ठेवलं आहे. तर आता त्याने मुलाचं नाव त्रिशान ठेवल्याचं समोर आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 8:33 am

Web Title: comedian kapil sharma reveals his son name on twitter kpw 89
Next Stories
1 “तो क्षण मी कधीच विसरणार नाही..”, तारक मेहता मधील दया बेनने सांगितली पहिल्या पगाराची कहानी
2 “म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला..”, अभिषेकने सांगितले ऐश्वर्याशी लग्न करण्याचे कारण
3 अक्षय पाठोपाठ गोविंदा करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X