गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन सुनील पाल चर्चेत आहे. या चर्चा सुनील पालने एक व्हिडीओ शेअर करत करोना काळात काम करणाऱ्या डॉक्टरांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे सुरु झाल्या आहेत. आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल सुनील पाल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता सुनील पालने माफी मागती असून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे म्हटले आहे.

भारतात करोना व्हायरची लाट आल्यापासून वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी हे फ्रन्टंलाईन वर्कस् म्हणून काम करत आहे. सरकारने करोना काळात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना करोना योद्धे म्हणून संबोधले आहेत. या काळात आघाडीवर असणारे डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, कॉमेडियन सुनील पालने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत करोना काळात काम करणाऱ्या डॉक्टरांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. आता त्याने ट्विटरवर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.

सुनील पालने ‘मी डॉक्टरांची माफी मागतो’ असे ट्वीटमध्ये म्हटले असून गृह मंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एम्स डॉक्टर्स असोसिएशन अशा अनेकांना त्याने डॅग केले आहे.

काय म्हणाला होता सुनील पाल?

“डॉक्टर हे देवाचे रूप आहे, परंतु ९० टक्के डॉक्टरांनी राक्षसाचे रुप धारण केले आहे आणि ते ढोंगी आहेत. कोविडच्या नावाखाली दिवसभर गरीब लोकांना धमकावले जात आहे आणि अत्याचार केले जात आहेत. बेड, प्लाझ्मा, औषध नाही, असे सांगून त्यांचा अपमान व छळ करण्यात येत आहे,” असे पालने व्हिडीओमध्ये म्हटले होते.

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सच्या प्रमुख डॉ. सुष्मिता भटनागर यांनी कॉमेडियन सुनील पालवर डॉक्टरांविरूद्ध आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप केला होता. अंधेरी पोलिसांनी डॉक्टरांविरूद्ध केलेल्या टीकेसाठी एफआयआर दाखल केला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार पालने एका कार्यक्रमात डॉक्टरांवर अवमानकारक टीका केली होती. आता सुनील पालने याबाबत माफी मागितली आहे.