News Flash

Happy Birthday Johnny Lever : विनोदाच्या बादशहाचे खळखळून हसवणारे हे व्हिडिओ बघाच

चित्रपटसृष्टीत त्यांच्या विनोदाचं टायमिंग कोणालाच जमलं नाही

जॉनी लिवर

गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेते जॉनी लिवर त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. त्यांचं फक्त नाव जरी ऐकलं तरी चेहऱ्यावर हास्य झळकल्याशिवाय राहत नाही. गेल्या ३३ वर्षांत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. पडद्यावर झळकताच प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडणाऱ्या अशा या विनोदवीराचा आज वाढदिवस. १९८४ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. विनोदी कलाकारांना फारशा महत्त्वाच्या भूमिका मिळत नाही असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र या कलेतही जॉनी लिवरने आपली वेगळी छाप पाडत विनोदी क्षेत्रात सर्वोच्च स्थानी आपलं नाव कोरलं. परफेक्ट टायमिंग, चेहऱ्यावरील हावभाव, डायलॉग बोलण्याची पद्धत या सर्वांमुळे आज ते अनेक स्टँडअप कॉमेडीयन्ससाठी आदर्श विनोदी कलाकार आहेत. त्यांच्या साठाव्या वाढदिवशी बॉलिवूड चित्रपटांमधील त्यांच्या काही अप्रतिम व्हिडिओंवर एक नजर टाकूयात…

बाजीगर
१९९३ मध्ये प्रदर्शित झालेला शाहरूखचा ‘बाजीगर’ चित्रपट सर्वांनाच माहित असेल. या थरारपटातही प्रेक्षकांना जॉनी यांनी पोट धरून हसण्यास भाग पाडलं. चहात साखरेऐवजी मीठ टाकण्याचं दृश्य असो किंवा प्रत्येक गोष्ट विसरण्याची सवय, या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकली होती.

खिलाडी
अक्षय कुमारच्या गाजलेल्या ‘खिलाडी’ चित्रपटात जॉनी यांनी लॉजच्या केअरटेकरची भूमिका साकारली. गूढ, रहस्यमय असलेल्या या आणखी एका चित्रपटात जॉनी यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

जुदाई
‘जुदाई’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेला तोड नाही असंच म्हणावं लागेल. अॅक्शन चित्रपट असो, लव्ह स्टोरी असो किंवा थरारपट त्यामध्ये जॉनी यांची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर व्हायचे. या चित्रपटात त्यांना मिळालेली ‘अब्बा डब्बा जब्बा’ म्हणणारी बायको आणि त्यानंतर झालेली त्यांची पंचाईत पाहून प्रेक्षक हसल्याशिवाय राहात नाहीत.

लव्ह के लिए कुछ भी करेगा
या चित्रपटात जॉनी लिवरने ‘अस्लम भाई’ या स्थानिक गुंडाची भूमिका साकारली. मात्र सर्वांना हसवणारा हा गुंड होता असं म्हणावं लागेल.

कहो ना प्यार है
ऋतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’मधला पोलीस तुम्हाला आठवतोय का? शौचालयाला जाण्यासाठी धडपडणाऱ्या जॉनी यांचे हावभाव आजही डोळ्यांसमोर आले की चेहऱ्यावर हास्य नक्कीच उमटतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 12:28 pm

Web Title: comedy actor johnny lever birthday his five best scenes videos
Next Stories
1 घटस्फोटानंतर या गायिकेकडे राहण्यासाठी घरही नव्हतं
2 या बॉलिवूड अभिनेत्रीने पाकिस्तानला म्हटले ‘आझादी मुबारक’, मिका सिंग भडकला
3 भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर आलेल्या सलमानचे अशाप्रकारे वाचले प्राण
Just Now!
X