कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा कधी एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच कपिलनं सोनी वाहिनीला काही नव्या कल्पना ऐकवल्याचं समजत होतं. या कल्पना वाहिनीच्या पसंतीस उतरल्या तर कपिल छोट्या पडद्यावर पुन्हा दिसेल. मात्र त्यापूर्वी कपिलनं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज आणलं आहे. कपिल एका चित्रपटाची निर्मीती करत आहे.

नुकतंच कपिलनं ट्विट करत याची माहिती दिली आहे. ‘सन ऑफ मनजीत सिंग’ या पंजाबी चित्रपटाचा कपिल निर्माता आहे. ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईल असंही कपिल म्हणाला. कॉमेडी शो, नंतर चित्रपट असं दोन्ही ठिकाणी आपलं नशिब आजमवल्यानंतर कपिल आता निर्मितीकडे वळला आहे.

Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!

कपिलच्या चाहत्यांनीही त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत . गेल्या काही दिवसांपासून नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या कपिलनं आपल्या नव्या कोऱ्या शोला अवघ्या तीन एपिसोडमध्येच सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर पूर्वाश्रमीची प्रेयसी प्रिती सिमोन्स आणि काही पत्रकारांसोबत झालेल्या ट्विटर वॉरनंतर कपिलनं छोट्या पडद्यापासून फारकत घेतली. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी ट्विटरद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. प्रकृतीच्या कारणास्तव आपण मनोरंजन विश्वापासून काही काळ विश्रांती घेत असल्याचं त्यानं म्हटलं, तसेच लवकरच पुनरागमन करू असा विश्वासही त्यानं दिला. आता पुनरागमन करण्यासाठी कपिल पूर्णपणे सज्ज झाला आहे.