News Flash

एका वर्षात कपिल शर्मा भरतो कोटयवधींचा टॅक्स; आकडा वाचून व्हाल थक्क

कपिल भरत असलेल्या टॅक्सची रक्कम साधीसुधी नाही, तर...

(संग्रहित छायाचित्र)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता म्हणजे कपिल शर्मा. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कपिलने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आज लोकप्रिय सेलिब्रिटींमध्ये त्याचे नाव आवर्जुन घेतलं जातं. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला कपिल आज अमाप संपत्तीचा मालक असून तो एका वर्षामध्ये जवळपास कोटयवधींच्या घरात इनकम टॅक्स भरतो.

कपिलने त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातच त्याच्या इनकम टॅक्सचा खुलासा केला आहे. एका वर्षात तो किती कोटींचा टॅक्स भरतो हे त्याने सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्याने सांगितलेली रक्कम थक्क करणारी असून अनेकांना ही रक्कम ऐकून धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

विनोदवीर कपिल शर्मा एका वर्षात तब्बल १५ कोटी रुपयांचा इनकम टॅक्स भरतो. देशाच्या विकासासाठी टॅक्स म्हणजेच कर भरणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या देशाचा विकास होतो आणि या विकास कामात आपला हातभार लागतो, असं कपिलने यावेळी सांगितलं.

दरम्यान,’द कपिल शर्मा शो’च्या मंचावर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने हजेरील लावली होती. त्यावेळी तिच्याशी बोलत असताना त्याने त्याच्या इनकम टॅक्सविषयी भाष्य केलं. विशेष म्हणजे त्याची ही रक्कम ऐकून ऐश्वर्यालाही धक्का बसला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 12:39 pm

Web Title: comedy king kapil sharma income tax amount ssj 93
Next Stories
1 नवीन वर्षात दीपिकाचा महत्त्वाचा निर्णय; सोशल मीडियावरील पोस्ट केल्या डिलीट?
2 मराठी चित्रपटसृष्टीचा दशकभरातला तोटा ४०० कोटींच्या घरात
3 ‘त्या’ घटनेनंतर तब्बल ६ महिने विद्याने आरशात पाहिला नाही चेहरा; कारण वाचून बसेल धक्का
Just Now!
X