21 January 2018

News Flash

टीआरपीच्या शर्यतीतून कपिलचा शो बाहेर

कपिलची पुढची खेळी काय असणार याकडे सर्वांचे लक्ष

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 8:08 PM

कपिल शर्मा

‘द कपिल शर्मा शो’ गेल्या बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कपिलची धमाल विनोदी खेळी आणि त्याला मिळणारी सहकलाकारांची साथ या सर्वांच्या बळावर ‘द कपिल शर्मा शो’ने टेलिव्हिजन विश्वात चांगलच स्थान निर्माण केलं होतं. पण, सुनील ग्रोवरसोबतच्या वादानंतर एकाएकी शोवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. सोनी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’ला लवकरच दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. पण, सद्यस्थिती पाहता त्याचा आनंद लुटण्याआधी कपिल आणि त्याची टिम दोनदा विचार करेल. कारण, टीआरपीच्या रेटिंगमध्ये कपिलच्या शोची घसरण सुरुच असल्याचे दिसतेय.

कधी एकेकाळी टीआरपी रेटींगमध्ये अग्रस्थानी असलेल्या या कार्यक्रमाला आता इतर सर्व कार्यक्रमांनी पिछाडले आहे. ‘नच बलिये ८’, ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमांनी ‘द कपिल शर्मा शो’ला अडचणीत पाडलं आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कपिलच्या शो ला ४६ लाख इम्प्रेशन्स मिळाले असून, तो आकडा आता ४४ लाख इम्प्रेशन्सवर घसरला आहे. ५५ लाख इम्प्रेशन्सपासून सुरुवात केलेल्या कपिलच्या शोला २०१७च्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ६४ लाख इतके विक्रमी इम्प्रेशन्स मिळाले होते. पण, आता मात्र या शोचा प्रेक्षकांवरील प्रभाव कमी झाल्याचे पाहायला मिळतेय.

सध्या टीआरपीच्या शर्यतीत ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ हा कार्यक्रम यशस्वी ठरत असून त्याला ५१ लाख इम्प्रेशन्स मिळाले आहेत. त्यामुळे आता इतर कार्यक्रमाच्या वाट्याचा येणारे यश पाहता आता कपिल कोणता नवा मार्ग अवलंबणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

First Published on April 21, 2017 8:04 pm

Web Title: comedy show the kapil sharma show out of the race of trp sa re ga ma pa lil champs is the new champion
  1. No Comments.