News Flash

PHOTO: विनोदाची राणी अडकली विवाहबंधनात

तिच्या जोडीदाराचा कलाविश्वाशी काहीच संबंध नाहीये

प्राजक्ता हनमघर

‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘फू बाई फू’ आणि ‘कॉमेडीची जीएसटी’ या कार्यक्रमांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता हनमघर नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या विनोदी अंदाजाने आणि अनोख्या अभिनय कौशल्याने आजवर प्रेक्षकांचं बरंच मनोरंजन केलं आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती. मालिका आणि विनोदी कार्यक्रमातून आपला प्रेक्षकवर्ग निर्माण करणाऱ्या प्राजक्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जोडीदारासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

कोणतंही कॅप्शन न देता फक्त काही इमोजींचा वापर करत प्राजक्ताने हा फोटो पोस्ट केला आहे. तिचा हा फोटो पाहताक्षणी त्याला कॅप्शनची काही गरज नाही असंच मत तयार होत आहे. साधेपणाने पार पडलेल्या छोटेखानी विवाहसोहळ्यात काही मोजक्या चेहऱ्यांनीच हजेरी लावल्याचं म्हटलं जात आहे. रजत धळे असं तिच्या जोडीदाराचं नाव असून, या कलाविश्वाशी त्याचा काहीच संबंध नाहीये. तो मुळचा धुळ्याचा असून, सध्याच्या घडीला पुण्यात एका प्रतिष्ठित कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे. प्राजक्ताने लग्नातील सुरेख फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांनीच कमेंट्समध्ये तिच्या या नव्या प्रवासाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

विनोदाचं टायमिंग, अफलातून संवादकौशल्य आणि अभिनय शैली या गोष्टींमुळे प्राजक्त ओळखली जाते. नऊवारी साडीपासून ते अगदी सर्वसामान्य महिलेच्या भूमिकेतही ती प्रभावीपणे आपली कला सादर करत आहे. दरम्यान, प्राजक्ता लग्नानंतरही अभिनय क्षेत्रातील करिअरवर लक्ष देणार असल्याचं कळतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 12:45 pm

Web Title: comedychi gst express fame marathi actress prajakta hanamghar got married posts photo on social media
Next Stories
1 BLOG : पटकथाच ‘सेन्सॉर’ केली तर?
2 …म्हणून ‘जब हॅरी….’च्या वितरकांची शाहरुखकडे धाव
3 तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या ‘सनम’चे उत्पन्न जाणून तुम्हालाही बसेल धक्का का?
Just Now!
X