News Flash

‘फाइंडिंग फॅनी’ची कथा पुस्तकरुपात

एखाद्या कथेवरून, एखाद्या कादंबरीवरून चित्रपट जन्माला येतो. अशावेळी, पुस्तक पहिले वाचा आणि मग तीच कथा पडद्यावर पहा अशी पद्धत असते. मगच तो चित्रपट कथेनुसार हुबेहूब

| September 4, 2014 06:39 am

एखाद्या कथेवरून, एखाद्या कादंबरीवरून चित्रपट जन्माला येतो. अशावेळी, पुस्तक पहिले वाचा आणि मग तीच कथा पडद्यावर पहा अशी पद्धत असते. मगच तो चित्रपट कथेनुसार हुबेहूब उतरला आहे की नाही, वगैरे चर्चा सुरू होते. चित्रपटापेक्षा मूळ कादंबरी वाचण्याचा अनुभवच चांगला होता, अशी शेरेबाजी होते. या सगळ्या प्रकाराला घाबरून ‘फाइंडिंग फॅनी’ चित्रपटाचा दिग्दर्शक होमी अडजानियाने आपलीच कथा पुस्तकरूपात येण्याआधी पडद्यावर साकारण्याला प्राधान्य दिले आहे.
‘फाइंडिंग फॅनी’ची पटकथा जन्माला आली तीच होमीच्या एका लघुकथेवरून. होमीने ही लघुकथा लिहिल्यानंतर त्याची सहलेखिका केर्सी खंबाटा हिने त्या लघुकथेचा आधार घेऊन कादंबरी लेखनाला सुरुवात केली होती. के र्सीने कादंबरीच्या रूपात फॅनीची कथा रंगवली. केर्सीची कादंबरी वाचल्यानंतर आपल्या चित्रपटाची पटकथा या कादंबरीवर आधारित असावी, असा निर्णय होमीने घेतला. मात्र, कादंबरी चित्रपटाआधी आली तर त्याची गंमतच संपून जाईल, अशी भीती वाटल्याने होमीने या कादंबरीच्या प्रकाशनाला लाल कंदील दाखवला होता. आता त्याचा चित्रपट पूर्ण झाला असून या महिन्यात तो प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे आता केर्सीची ‘निर्णय फॅनी’ ची कादंबरी प्रकाशित व्हायला हरकत नाही, असे वाटून त्याने कादंबरीच्या प्रकाशनासाठी खटपट सुरू केली आहे.
कादंबरी वाचायची आणि मग त्याच्यावर आधारित चित्रपट बघायचा, ही पद्धतच योग्य आहे. पण, का कोण जाणे ‘निर्णय फॅनी’च्या बाबतीत मला कादंबरीआधी लोकांनी माझा चित्रपटच बघावा, असे वाटत होते. आता माझा चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. आणि केर्सीच्या कादंबरीसाठी काही प्रकाशकांकडूनही विचारणा झाली असल्याने ती प्रक्रियाही सुरू करायला हरकत नसल्याचे होमीने सांगितले. २०० हून अधिक पानांची ही कादंबरी आता प्रकाशनासाठी तयार असून पुढच्या वर्षी ती वाचकांच्या हातात असेल, अशी माहिती होमी अडजानियाने दिली आहे. तर या कादंबरीची लेखिका केर्सी हिने लिहिलेल्या कादंबरीवरून पटकथा तयार करण्याची प्रक्रिया फारच वेगळी, कथेच्या खोल गाभ्यात नेणारी होती, असे सांगितले. चित्रपट बनवणे हाच आमचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे कादंबरी लिहून पूर्ण झाल्यावरही होमीने ती थांबवली यात काही गैर वाटले नाही. उलट, त्यादरम्यान अशाप्रकारे वेगळी पटकथा लिहिण्याचा अनुभव मिळाला, असे के र्सीने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 6:39 am

Web Title: coming soon finding fanny the novel
Next Stories
1 बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठीचा ‘अरुणोदय’!
2 अमृता दासगुप्ता बॉलीवूड पदार्पणास सज्ज
3 या पाच कारणांसाठी पाहा प्रियांकाचा ‘मेरी कोम’!
Just Now!
X