News Flash

CAA Protest : ‘ते’ ट्विट आलं फरहान अख्तरच्या अंगाशी, झाली पोलीस तक्रार

देशभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी आदोलकांची धरपकड केली.

“सोशल मीडियावर नको, आता थेट मैदानात भेटा” असे ट्विट करुन लोकांना मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात येऊन नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन करणाऱ्या अभिनेता फरहान अख्तर विरोधात आता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हैदराबादमधील करुणा सागर यांनी फरहान विरोधात तक्रार दाखल केली. फरहान दलित, मुस्लिम आणि नास्तिक लोकांमध्ये भय निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. असा आरोप करुणा सागर यांनी केला आहे.

Viral Video : ‘देसी जस्टिन बिबर’वर नेटिझन्स झाले फिदा

आपण हिंदू आहोत का? मुलाच्या प्रश्नाने ‘हा’ चित्रपट निर्माता हैराण

करुणा सागर हैदराबादमधील प्रसिद्ध वकिल आहेत. ते हिंदू संघटन या संस्थेचे कार्यकर्ता देखील आहेत. नुकतेच फरहान अख्तरने ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन केले होते. या विरोधात करुणा सागर यांनी तक्रार दाखल केली आहे. फरहान सोशल मीडियाचा वापर देशातील नागरिकांमध्ये आराजकता निर्माण करण्यासाठी करत आहे. त्याच्या सोशल मीडिया पोस्ट व वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशातील दलित, मुस्लिम आणि नास्तिक लोकांमध्ये एकप्रकारचे भय निर्माण होत आहे. असे आरोप करुणा सागर यांनी आपल्या दिलेल्या तक्रारीत केले आहेत.

यापूर्वी काय म्हणाला होता फरहान अख्तर?

“ही आंदोलनं का महत्वाची आहेत, हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. १९ ऑगस्ट रोजी मुंबईतील क्रांती मैदानात भेटू. फक्त सोशल मीडियावरुन विरोध करण्याची वेळ आता संपली आहे.” अशा आशयाचे ट्विट फरहानने केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 12:03 pm

Web Title: complaint filed against farhan akhtar over comments on caa mppg 94
Next Stories
1 मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक प्रयोग, आता येतोय केवळ एकच कलाकार असलेला चित्रपट
2 CAA Protest : रजनीकांत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3 लसाविही निघेना!
Just Now!
X