News Flash

रिअॅलिटी शोमधील अल्पवयीन मुलीचे चुंबन घेतल्याप्रकरणी पपॉनविरोधात तक्रार दाखल

'या' व्हिडिओमुळे त्याच्या अडचणीत वाढ

पपॉन

‘मोह मोह के धागे’, ‘कौन मेरा’, ‘क्यूँ’ या गाण्यांसाठी ओळखला जाणारा अंगर्ग पपॉन महंत म्हणजेच लोकप्रिय गायक पपॉन सध्या अडचणीत सापडला आहे. रिअॅलिटी शोच्या स्पर्धकाशी असभ्य वर्तन केल्याप्रसंगी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अल्पवयीन स्पर्धक असणाऱ्या एका मुलीचे चुंबन घेतल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली.

पपॉनविरोधात ‘पोस्को’ अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. पपॉन त्या मुलीकडे चुकीच्या पद्धतीने व्यक्त झाला असे त्या तक्रारीत म्हटले. पपॉनने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो एका अल्पवयीन स्पर्धकाचे चुंबन घेताना दिसतोय. ‘व्हॉईस ऑफ इंडिया किड्स’ या रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांसोबतच्या या व्हिडिओत तो ही कृती करताना दिसतोय. पपॉनची ही कृती चुकीची असून, त्याने असे करणे योग्य नसल्याचे तक्रारकर्त्यांचे मत आहे.

VIDEO: धोनीचा संयम सुटला, मनिष पांडेबद्दल अपशब्द वापरला

रुना भुयान यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांनी पपॉनच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. ‘पपॉनचे ते कृत्य पाहून मला धक्काच बसला. त्या अल्पवयीन मुलीच्या चेहऱ्याला रंग लावतानाच त्याने तिचे चुंबन घेतले. हा व्हिडिओ पाहून रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या त्या अल्पवयीन मुलीबद्दल मला चिंता वाटू लागली आहे’, असे या तक्रारीत म्हटले आहे. सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओवर अनेकांनीच आपली प्रतिक्रिया दिली असून, पपॉनवर आगपाखड केली. दरम्यान, पपॉनच्या मॅनेजरने याविषयी प्रतिक्रिया देत त्या मुलीला कोणतीच इजा पोहोचवण्याचा किंवा तिच्याशी चुकीचे वागण्याचा आमचा हेतू नसल्याचे ‘गुवाहाटी प्लस’शी बोलताना स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 10:19 am

Web Title: complaint filed against popular singer papon under pocso act for kissing minor girl on reality show
Next Stories
1 बनावट आधार कार्ड दाखवून अभिनेत्रीच्या घरी चोरी
2 फ्लॅशबॅक : ‘बटवारा’ आणि जे. पी. दत्ताची खासियत…
3 Blackmail Movie Trailer: गुंतागुंतीचा ‘ब्लॅकमेल’
Just Now!
X