आपल्या बिनधास्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. स्वरा बऱ्याच वेळा सामाजिक प्रश्नांवर उघडपणे तिचे मत मांडत असते. त्यामुळे तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते. पण बिनधास्त स्वराला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नसल्याचे दिसते. मात्र आता स्वरा विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

कानपूरमध्ये विजय बक्शी या व्यक्तीने स्वरा विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. स्वरा तिच्या भाषणांमधून आणि वक्तव्यांमधून दोन समाजांमध्ये द्वेष पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तसेच तिच्या या वागण्यामुळे जगभरतात भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचे बक्षी यांनी म्हटले आहे. कानपूर न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून येत्या २० मार्चला सुनावणी होणार आहे.

काय आहेत याचिकेतील आरोप?

स्वरा भास्कर विरोधात वियज बाक्क्षी या व्यक्तीने याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मते स्वरा ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण ती सोशल मीडिया पोस्ट, वक्तव्य आणि भाषणांमधून प्रत्येकवेळी भारत सरकार, न्यायालय आणि सुरक्षा रक्षकांवर निशाणा साधत असते. त्यामुळे ती समाजात द्वेष आणि लोकांमध्ये फूट पसरवण्याचे काम करते. या सर्वामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचे संबंधित याचिकेत म्हटले आहे.