News Flash

सूड उगवण्यासाठीच रियाकडून तक्रार; सुशांतच्या बहिणींचा आरोप

सुशांतच्या बहिणींच्या याचिकेवर रिया, सीबीआय आणि मुंबई पोलिसांनी उत्तर दाखल केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सूड उगवण्यासाठीच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने आपल्याविरोधात तक्रार दाखल केल्याचा आरोप अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या बहिणी प्रियांका आणि मीतू सिंह यांनी बुधवारी उच्च न्यायालयात केला.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुशांतच्या बहिणींनी त्याच्यासाठी औषधाची बनावट चिठ्ठी मिळवल्याचा आरोप करत रियाने दोघींविरोधात वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याच्याआधारे पोलिसांनी दोघींविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रियांका आणि मीतूने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सुशांतच्या बहिणींच्या याचिकेवर रिया, सीबीआय आणि मुंबई पोलिसांनी उत्तर दाखल केले आहे. राजपूत बहिणींनी बुधवारी प्रतिज्ञापत्र दाखल करत रियाच्या उत्तराला प्रामुख्याने प्रत्युत्तर दिले आहे. त्यात त्यांनी रियाने सूड उगवण्यासाठी आपल्याविरोधात तक्रार केल्याचा आरोप केला आहे.

म्हणणे काय?

रियाची तक्रार निराधार असून, गृहतिकांवर आधारलेली आहे. आपल्या वडिलांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बिहार पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीला विरोध करण्यासाठी रियाने तक्रार केली, असा दावाही प्रियांका आणि मीतू यांनी केला आहे. रियाची तक्रार आणि त्याआधारे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हे एक असे उदाहरण आहे जेथे निराधार आरोप करण्यात आले असून त्यातून गुन्हा झालेला आहे हे सिद्धच होत नाही, असेही राजपूत बहिणींनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. एका खोटी कथा रचून आपली प्रतिमा मलीन केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 12:27 am

Web Title: complaints from rhea for revenge sushant sisters accused abn 97
Next Stories
1 चित्रपटगृहांचा पडदा पुढील आठवडय़ात उघडणार
2 “बॉलिवूडमधील लांडगे मला पाहून पळतात”; कमाल खानने केला चकित करणारा दावा
3 ‘नाच मेरी रानी’ गाण्यावर नोराचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X