‘ढिशूम’ या चित्रपटानंतर अभिनेता वरुण धवन काही काळ बॉलिवूडपासून दूर होता. पण वरुण धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चेचे निमित्त आहे सलमान खान…..बाचकून जाऊ नका. वरुण धवन लवकरच अभिनेता सलमान खानच्या ‘जुडवा’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनच त्याबाबतची घोषणा केली आहे. ट्विटरवरही वरुणच्या या चित्रपटाचा हॅशटॅग ट्रेण्डमध्ये होता. वरुणसोबत या चित्रपटामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नूसुद्धा झळकणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक आणि खुद्द वरुणचे वडिल डेविड धवन करणार आहेत. १९९७ला प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’ या चित्रपटाचेही दिग्दर्शनसुद्धा डेविड धवन यांनीच केले होते. त्यामुळे येत्या काळात ‘जुडवा २’ या चित्रपटामध्ये वरुण धवन सलमान खानची भूमिका वठवू शकेल का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. ‘जुडवा २’ या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खान, अभिनेत्री रंभा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्यामुळे नाही म्हटले तरीही वरुणसमोर हे एक प्रकारचे आव्हान आहे असेच म्हणावे लागेल. याआधी वरुणने त्याच्या वडिलांच्या दिग्दर्शनात ‘तु मेरा हिरो’ या चित्रपटामध्ये काम केले होते.

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
Rohini Khadse Raksha Khadse
रोहिणी खडसे भाजपात जाणार?, रक्षा खडसेंच्या आवाहनावर प्रतिक्रिया देत म्हणाल्या…
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रींच्या भूमिकेत झळकणार असणाऱ्या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने याआधीही तिच्या ‘ढिशूम’ या चित्रपटात वरुणसह काम केले होते. तर अभिनेत्री तापसी पन्नूही तिच्या ‘पिंक’ या चित्रपटातील अभिनयामुळे प्रकाशझोतात आली होती. या चित्रपटामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली होती. तुर्तास ‘जुडवा २’ची स्टार कास्ट पाहता हा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या मनावर तिच जादू करु शकणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.