News Flash

जाणून घ्या सोनम आणि मिहीकामध्ये काय आहे नातं

सोनमने सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे या चर्चा सुरु झाल्या

‘बाहुबली’ या चित्रपटातून खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आलेला अभिनेता म्हणजे राणा डग्गुबती. बऱ्याचदा आपल्या खासगी आयुष्यावर बोलणे टाळणाऱ्या राणाने सोशल मीडिया पोस्टद्वारे मोठा खुलासा केला. त्याने मिहीका बजाज सोबत फोटो शेअर करत रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले. त्यानंतर सोशल मीडियावर मिहीका आणि राणाच्या चर्चा रंगल्या. पण ही मिहीका आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. तसेच बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने मिहीका आणि राणाचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मिहीका आणि सोनम कपूर यांच्यामध्ये नेमकं काय नातं आहे हे जाणून घ्यायला चाहते फार उत्सुक आहेत.

राणा डग्गुबतीला मिहीकाने होकार देताच सोशल मीडियावर पोस्ट करत नात्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर सोनम कपूरने देखील त्या दोघांचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत राणाचे कुटुंबामध्ये स्वागत आहे असे म्हटले आहे. ‘माझी प्यारी मिहीका तुला खूप खूप शुभेच्छा’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तिची ही पोस्ट पाहून सोनम आणि मिहीकामध्ये नेमकं काय नातं आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सोनप कपूर आणि मिहीका बजाज यांचे कुटुंबीय हे क्लोज फ्रेंड असल्याचे म्हटले जाते. सोनम कपूर मिहीकाला लहान बहिणी प्रमाणे मानते. त्यामुळे सोनम राणाची मेहुणी झाल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी मिहीकाने सोशल मीडियावर तिचा आणि सोनमचा फोटो शेअर करत सोनमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

मिहीका बजाजची आई बंटी बजाज या दागिन्यांच्या व्यवसायातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्या भारतातील प्रसिद्ध वेडिंग डेकॉर प्लॅनरसुद्धा होत्या. २०१७ मध्ये मिहीकाने स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी उघडली. ‘ड्यू ड्रॉप डिझाइन स्टुडिओ’ असे तिच्या कंपनीचे नाव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 7:35 pm

Web Title: connection between actress sonam kapoor and rana daggubati girlfriend mihika avb 95
Next Stories
1 लॉकडाउननंतर ‘हे’ कलाकार अडकणार लग्न बंधानात?
2 स्थलांतरितांच्या लोंढ्याचा व्हिडीओ पोस्ट करत शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींना सवाल
3 “आत्मनिर्भर कोणाला व्हायच आहे?”; दिग्दर्शकाने विचारला मोदींना प्रश्न
Just Now!
X