27 February 2021

News Flash

‘केआरकेला व्हायचंय मुलगी’; ट्विटमुळे होतेय सोशल मीडियावर चर्चा

केआरकेने रविना टंडनाला लगावला टोला?

आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे कमाल रशिद खान म्हणजे केआरके कायमच चर्चेत असतो. विविध विषयांवर कोणीही विचारलेलं नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मतं मांडतो. विशेष म्हणजे सेलिब्रिटी त्याच्या ट्विटकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण, नेटकरी मात्र त्याच्या ट्विटची आतुरतेने वाट पाहात असतात. अलिकडेच त्याने ट्विट करुन  मुलगी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

“देवाकडे एकच प्रार्थना आहे, माझा पुढचा जन्म एका सुंदर आणि चांगल्या मुलीच्या रुपात कर. कारण, त्यामुळे मला आयुष्यात कधीत कोणती मेहनत करावी लागलणार नाही”, असं ट्विट केआरकेने केलं आहे. विशेष म्हणजे या ट्विटच्या माध्यमातून त्याने अभिनेत्री रविना टंडनला टोला लगावला आहे.

केआरके ने केलेल्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. खरंतर त्याने हे ट्विट नेमकं कोणासाठी केलं होतं असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. मात्र, केआरकेने आणखी एक नवीन ट्विट करुन त्यात अभिनेत्री रविना टंडनच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे केआरकेने आता त्याच्या टीकेची तोफ रविना टंडनच्या दिशेने डागल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, कमाल खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तो नेहमीच चकित करणारी चित्रविचित्र वक्तव्य करत असतो. या पार्श्वभूमीवर त्याने सोशल मीडिया वादावर केलेलं हे ट्विट सध्या जोरदार चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 10:44 am

Web Title: controversy kamaal rashid khan aka krk tweet on raveena tondon ssj 93
Next Stories
1 थाटात पार पडलं चिरंजीवी सरजाच्या पत्नीचं डोहाळ जेवण; दिराने दिलेल्या गिफ्टची सोशल मीडियावर चर्चा
2 प्रिती झिंटाने १०-१५ वेळा नाही, तर तब्बल इतक्या वेळा केली करोना चाचणी
3 यश चोप्रा यांचं ‘या’अभिनेत्रीवर होतं जीवापाड प्रेम; पण ‘या’ कारणामुळे नाही झालं लग्न
Just Now!
X