29 September 2020

News Flash

अक्षयला मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार वादात

अक्षयला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमारच्या कॅनडा नागरिकत्वाबाबतचा वाद संपत नाही तोच अक्षय आता आणखी एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अक्षय जर कॅनडाचा नागरिक आहे तर त्याला भारताचा राष्ट्रीय पुरस्कार दिलाच कसा ? असा थेट सवाल सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे. त्यामुळे अक्षयला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं दिसून येत आहे.

सोशल मीडियावर अक्षयच्या राष्ट्रीय पुरस्काराला विरोध होत असतानादेखील फिल्म एडिटर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अपूर्व असरानी आणि चित्रपट दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी अक्षयला पाठिंबा दिला आहे. या दोघांनीही ट्विटरच्या माध्यमातून अक्षयच्या समर्थनार्थ आपली बाजू मांडली आहे.

“हो, खरंच हा महत्वाचा प्रश्न आहे. भारताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्याची योग्यता एका कॅनडाच्या नागरिकाची असू शकते का?, असा उपरोधिक प्रश्न त्यांनी विचारला आहे. सोबतच २०१६ साली अक्षयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी हा पुरस्कार ‘अलीगढ़’साठी मनोज वाजपायी यांना मिळावा असे आम्हाला वाटत होते. म्हणजे ज्युरी किंवा मंत्रालयाकडून जर चूक झाली असेल तर ती सुधारायला हवी का?” असंही त्यांनी म्हटलं आहे.

“विदेशी मूळ असणाऱ्या लोकांनाही हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. हे कायदेशीर आणि पूर्णतः नियमांना धरून आहे. मी स्वतः राष्ट्रीय पुरस्कार पंच समितीचा सदस्य होतो. माझे मित्र मनोज श्रीवास्तव यांनी हे नियम माझ्यापर्यंत पोहोचवले आहेत. ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे”. या मजकूरासोबत राहुल ढोलकिया यांनी डायरक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल्सचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

दरम्यान, अभिनेता परेश रावल यांनीही अक्षयचं समर्थन केलं आहे. “अक्षयने त्याच्या नागरिकत्वाबाबत केलेला प्रत्येक शब्द खरा असून अक्षय आम्ही सारे जण तुझ्यासोबत आहोत. तू इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस”, असं परेश रावल यांनी म्हटलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 3:56 pm

Web Title: controversy over akshay kumars eligibility for national film awards paresh rawal and other celebrities support
Next Stories
1 कंगनासह बॉलिवूड सेलिब्रेटींचा भाजपाला पाठिंबा
2 …म्हणून दाक्षिणात्य अभिनेता सुदीपने मानले सलमानचे आभार
3 Video : अन्यायाविरुद्ध तेजश्रीचा ‘एल्गार’
Just Now!
X