पुणे : ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटात गानहिरा हिराबाई बडोदेकर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी या बुजुर्ग कलाकारांवरील चित्रीत करण्यात आलेले प्रसंग हीन दर्जाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या कलेबद्दल भीषण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने या चित्रपटाकडे रसिकांनीच पाठ फिरवावी आणि आपल्या दैवतांचे असे विद्रुपीकरण खपवून घेऊ नये, असे आवाहन मराठी रसिकांना करण्यात आले आहे.

गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचे नातू आणि प्रसिद्ध तबलावादक निशिकांत बडोदेकर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी तसेच हिराबाई बडोदेकर यांची नात आणि प्रसिद्ध गायिका मीना फातर्पेकर यांनी पत्रकाद्वारे या चित्रपटातील काही प्रसंगांना आक्षेप घेतले आहेत.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आपल्या अत्युच्च दर्जाच्या कलेने बडोदेकर आणि जोशी या महान कलावंतांनी भारतीय अभिजात संगीतामध्ये जी मोलाची भर घातली आहे त्याची बूज तर सोडाच, परंतु त्यांच्याबद्दल समाजात हीन समज होण्यास ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट कारणीभूत ठरत आहे. ज्या काळात स्त्रियांना अभिजात संगीताच्या मैफलींना जाण्यासही परवानगी नाकारली जात होती त्या काळात हिराबाईंनी मैफलीच्या मध्यभागी बसून आपली कला सादर केली. ही घटना केवळ संगीताच्या क्षेत्रापुरतीच मर्यादित नव्हती. तर, त्यामुळे सामाजिक क्रांती अधिक वेगवान होण्यासही मदत झाली. अशा महान कलावंताचे घर हे दारू मिळण्याचे ठिकाण कसे असू शकते, असा सवाल बडोदेकर यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिकूल परिस्थितीतही हिराबाईंनी संगीताची सेवा केल्यामुळे सर्व कलाकारांसाठी त्या देवासमान झाल्या. त्यांच्याबद्दल सारे कलाकार एकेरी भाषेत स्वप्नातही बोलू शकणार नाहीत. हे केवळ भयंकरच नाही तर या कलाकारांचा घोर अपमान करणारे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

आपल्या कलेने साऱ्या जगाला कवेत घेणाऱ्या पं. भीमसेनजी यांची चित्रपटात रेखाटलेली व्यक्तिरेखा पाहून त्यांच्या कलेबद्दल भीषण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, असे श्रीनिवास जोशी यांनी स्पष्ट केले.