अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांनी बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच पेटलं आहे. त्यानंतर आता अभिनेता सलमान खानवर बिग बॉसच्या एका माजी महिला स्पर्धकाने लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
बिग बॉसची माजी स्पर्धक पूजा मिश्राने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सलमानवर बलात्काराचे आरोप केले आहेत. इतकंच नाही तर तिने सलमानसोबत सोहेल खान, अरबाज खान आणि शत्रूघ्न सिन्हावरदेखील आरोप केले आहेत.
‘सुल्तान’ चित्रपटावेळी सलमान आणि शत्रूघ्न सिन्हा या दोघांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले असून याविषयीची माहिती या दोन्ही कालाकारांच्या कुटुंबियांना होती, असं पूजाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे पूजाने सलमान आणि शत्रूघ्न सिन्हा यांच्यावर पहिल्यांदाच असे आरोप केले नसून यापूर्वीही काही आरोप केले आहेत.
सलमानवर लैंगिक छळ केल्याचा आरोप करणाऱ्या पूजा मिश्राने २०१६ मध्येही सलमानवर असेच आरोप केले होते. पूजाने सलमान आणि त्याचे कुटुंबीय, शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केला होते. या सर्वांनी दिल्लीत ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या टीव्ही शोच्या शूटिंगदरम्यान बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
First Published on October 12, 2018 7:36 pm