24 January 2021

News Flash

‘मनोरंजनाची भन्नाट सुरुवात’; ‘कुली नंबर १’चं पोस्टर प्रदर्शित

'कुली नंबर १'चा ट्रेलर 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता गोविंदाचा कुली नंबर १ हा चित्रपट विसरणं कोणत्याची प्रेक्षकाला किंवा चाहत्याला शक्य नाही. या चित्रपटाने ९०चा काळ चांगलाच गाजवला होता. त्यामुळे डेव्हिड धवन यांनी चित्रपटाचा रिमेक करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून नुकतंच त्याचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. सोबतच त्याच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर करण्यात आली आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा वरुण धवन आणि सारा अली खान ही जोडी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. हे दोघं मुख्य भूमिकेत झळकणार असून त्यांची धम्माल केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरसोबत या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटदेखील सांगण्यात आली आहे. त्यानुसार, या चित्रपटाचा ट्रेलर २८ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)


प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये सारा पारंपरिक साडीमध्ये दिसून येत आहे. तर वरुण पाच वेगवेगळ्या रुपांमध्ये झळकला आहे. हे पोस्टर साराने शेअर केलं असून “मनोरंजनाची भन्नाट सुरुवात, कुली नंबर वनसोबत पहिली भेट. ट्रेलर पाहण्यासाठी तयार रहा”, असं कॅप्शन तिने या पोस्टरला दिलं आहे.

वाचा : मिर्झापूरमधील ‘हा’ अभिनेता अडकणार विवाहबंधनात; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत बांधणार साताजन्माची गाठ

दरम्यान, कुली नंबर १ हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या कुली नंबर १ चा रिमेक आहे.या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर या नव्या रिमेकमध्ये वरुण धवन व सारा अली खान झळकणार आहेत. हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 2:39 pm

Web Title: coolie no 1 poster out trailer 28 november varun dhawan and sara ali khan ssj 93
Next Stories
1 आमिर खानच्या मुलीने शेअर केला छोट्या भावासोबतचा फोटो, म्हणाली…
2 रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारल्यानंतर आता शिवानीचा लक्षवेधी लूक
3 ‘गुन्हेगारी रोखण्यासाठी तुम्ही काय केलं?’; ‘दिल्ली क्राईम’वरुन ट्रोल करणाऱ्यांना रिचाचं प्रत्युत्तर
Just Now!
X