News Flash

“मम्मी कसम.. हे गाणं पाहून व्हाल वेडे”; राजपाल यादवनं शेअर केला मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ

राजपाल यादवनं पोस्ट केलेला हा व्हिडीओ एकदा पाहाच...

वरुण धवन हा बॉलिवूडमधील आघाडिचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. वरुण लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘कुली नंबर १’ असं आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘मम्मी कसम’ हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अवश्य पाहा – चला आत्मनिर्भर होऊया; बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी सोनू सूद देतोय रिक्शा

‘मम्मी कसम’ या गाण्यात वरुण धवन आणि सारा अली खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यात दोघांचीही खूप सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. जावेद मोहसीन, देव नेगी आणि नेहा कक्कर या तिघांनी मिळून हे गाणं गायलं आहे. शिवाय दानेश साबरी याने या धमाकेदार गाण्याची निर्मिती केली आहे. अभिनेता राजपाल यादव याने या गाण्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. हे गाणं पाहून तुम्ही वेडे व्हाल असं म्हणत त्याने या गाण्याचं कौतुक केलं आहे.

अवश्य पाहा – प्रियांकाचा ग्लॅमरस लूक पाहून हृतिक झाला घायाळ; म्हणाला, तू तर…

अवश्य पाहा – “आम्ही अन्नदाता आहोत दहशतवादी नाही”; शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्याचा केंद्राला टोला

‘कुली नंबर १’ हा वर्षातील सर्वात मोठ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. गेल्या वर्षीपासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. कुली नंबर १ हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या कुली नंबर १ चा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर या नव्या रिमेकमध्ये वरुण धवन व सारा अली खान झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 11:37 am

Web Title: coolie no 1 rajpal yadav mummy kassam mppg 94
Next Stories
1 Video : ‘माझी नवरी दिसतेस गं..’; मराठमोळ्या लूकमध्ये कार्तिकी-रोनितचा रोमॅण्टिक अंदाज
2 ‘हीच तुझी खरी ताकद’, NCB अधिकारी असलेल्या पतीसाठी क्रांती रेडकरची खास पोस्ट
3 साडी, नथ आणि मेकअपमध्ये प्राजक्ता गायकवाडचा वर्कआऊट; पाहा व्हिडीओ
Just Now!
X