News Flash

अभिनेता अनिरुद्धची प्रकृती गंभीर, २ महिन्याच्या मुलाला सोडून पतीकडे आली पत्नी

भोपाळमध्ये एका वेब सीरिजचे चित्रीकरण सुरु असताना अनिरुद्धला करोनाचा संसर्ग झाला.

छोट्या पडद्यावरील ‘शक्ति – अस्तित्व के एहसास की’ या लोकप्रिय मालिकेत काम करणारा अभिनेता अनिरुद्ध दवेची गेल्या आठवड्यात करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पण आता त्याची तब्येत बिघडली असून त्याला आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. अनिरुद्ध दवेच्या चांगल्या आरोग्यासाठी त्याचे चाहते आणि मित्र परिवार प्रार्थना करत आहेत. तर, त्याची पत्नी आणि अभिनेत्री शुभी आहूजाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शुभीने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केली आहे. शुभीने दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाला जन्म दिला होता. त्यात आता अनिरुद्धची तब्येत बिघडली असून शुभीला मुलाला आणि नवऱ्याला कसं सांभाळाव लागतं आहे ते सांगितलं आहे. शुभीने अनिरुद्ध आणि त्यांचा मुलगा अनिष्काचा एक फोटो शेअर केला आहे. “मी सध्या अनिरुद्धकडे जात आहे जो सध्या खूप गंभीर स्थितीत आहे आणि मला माझ्या २ महिन्याच्या मुलाला अनिष्कला घरी सोडून यावे लागले. माझ्यासाठी आत्ता हे सर्वात मोठे आव्हान आहे कारण एकीकडे, माझ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या २ महिन्यांच्या बाळाला आणि दुसरीकडे अनिरुद्धलाही माझी गरज आहे. यावेळी मी अनिरुद्धसोबत असणे आवश्यक आहे,” असे शुभी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by SHUBHHI (@shubhiahuja)

पुढे शुभी म्हणाली, “माझ्या आयुष्यातील ही सर्वात कठीण वेळ आहे. कृपया प्रार्थना करा, मी प्रत्येक प्रियजनांना, आमचे मित्र, कुटुंब, सहकारी, अनिरुद्धच्या चाहत्यांना विनंती करते. सध्या माझ्या अनिरुद्ध आणि अनिष्कच्या वडिलांना तुमच्या प्रार्थनांची खूप गरज आहे. आपण सगळे एकत्र येऊन हे ठीक करु शकतो. आपण सगळे एकत्र येऊन त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करु या,” अशा आशयाचे कॅप्शन शुभीने तो फोटो शेअर करतं दिले आहे.

भोपाळमध्ये एका वेब सीरिजचे चित्रीकरण सुरु असताना अनिरुद्धला करोनाचा संसर्ग झाला. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. पण अनिरुद्धची तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 1:37 pm

Web Title: corona positive aniruddh dave is in icu in bhopal wife shubhi ahuja left her 2 month old son back home to be with husband shares struggle dcp 98
Next Stories
1 Assembly Election Results 2021: “अजून एक काश्मिर तयार होत आहे” -अभिनेत्री कंगना रणौत
2 करोनाने आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री हिरावली ; अभिनेत्री गीता बहल यांचं निधन
3 “फक्त आकडे….तिकडे मृत्युंचे तर इकडे जागांचे!” – स्वानंद किरकिरे यांचं ट्विट चर्चेत
Just Now!
X