रेश्मा राईकवार

दरवर्षी मे महिन्यात आयोजित के ल्या जाणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पडघम जगभर एप्रिलपासूनच वाजायला सुरूवात होते. जगभरातील दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांसमोर आणणारा हा महोत्सव वेगवेगळ्या कारणाने कायम चर्चेत असतो. कानसाठी जगभरातून निवडले जाणारे चित्रपट, बॉलिवूडमधून कानवारी करणारे चित्रपट, सरकारी कृपेने का होईना कान महोत्सवाला हजेरी लावणारे मराठी चित्रपट आणि कानच्या रेड कार्पेटवर झळक णारे आपले देशी सितारे अशी कितीतरी धामधूम या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने होत असते. यावर्षी मात्र ही धामधूम अनुभवायला मिळणार की नाही हा दूरचाच प्रश्न आहे, कारण यावर्षी या महोत्सवावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. जगभरात सगळीकडेच करोनाचा हाहाकार माजलेला असल्याने पुढच्या  दोन महिन्यातील अनेक नियोजित मोठमोठे सोहळे, कार्यक्रम एकतर रद्द के ले गेले आहेत किं वा पुढे ढकलण्यात आले आहेत. १२ ते २३ मे दरम्यान होणारा कान महोत्सवही रद्द होणार अशा चर्चा सुरु होत्या मात्र अद्याप तरी हा महोत्सव जुन-जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आला असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. संपूर्ण जगावर जे संकट आलं आहे त्याचा विचार करता सध्या करोनाग्रस्तांचाच विचार पहिल्यांदा महत्वाचा ठरतो. हा महोत्सव रद्द न करता काय करता येईल, यासाठी वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी सुरू आहे. आता तरी नियोजित वेळेत तो न घेता जुन-जुलैपर्यंत त्यासाठी वाट पाहणेच योग्य आहे, असे आयोजकांनी स्पष्ट के ले आहे. फ्रान्स सरकार, कान सिटी हॉल, महोत्सवातील इतर भागीदार यांच्याबरोबर सातत्याने आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आढावा घेत आहोत. त्यांच्याकडून इथली परिस्थिती सुरळीत झाल्याचे संके त आल्यावरच पुढचे निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट के ले आहे. कान महोत्सवाच्या इतिहासात याआधीही हा महोत्सव रद्द करावा लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ही काही पहिलीच वेळ नाही. १९३९ मध्ये या महोत्सवाची सुरूवात झाली तेव्हा एक चित्रपट दाखवून झाला न झाला तोच महोत्सव बंद करावा लागला होता. सप्टेंबरमध्ये हिटलरच्या सैन्याने पोलंडवर हल्ला चढवला होता आणि त्यामुळे दुसरे महायुध्द छेडले जाणार याची कु णकु ण लागली होती. त्यावेळी बंद झालेला हा महोत्सव थेट युध्द संपल्यानंतर १९४७ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आला होता. आता जगावर जे संकट ओढवले आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी किती वेळ लागेल याचा आताच अंदाज लागणे कठीण आहे. तरीही आयोजकांनी महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कानसारखेच इतर काही महोत्सवाचे महोत्सव आधीच रद्द करण्यात आले आहेत. द कान्स लायन्स फे स्टिव्हल, इंटरनॅशनल टेलीव्हिजन मार्के ट अ‍ॅण्ड टीव्ही फे स्टिव्हल कान सिरीज हे दोन्ही सोहळे त्याचबरोबरीने बीजिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, फ्रीबर्ग महोत्सव हे महत्वाचे सोहळेही रद्द करण्यात आले आहेत. तर कान महोत्सवाबरोबरच सुरु होणारे कान फिल्म मार्के ट व्हर्च्युअल  प्लॅटफॉर्मवर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

‘नो टाईम टू डाय‘

करोनाचेच सावट हॉलिवूड इंडस्ट्रीवरही मोठया प्रमाणावर आहे. जगभरात अनेक चित्रपटांची चित्रिकरणे थांबवण्यात आली आहे. एप्रिल-मे हे दोन सुट्टीचे महिने लक्षात घेऊन अनेक बिग बजेट हॉलिवूडपट प्रदर्शनासाठई सज्ज होते. मात्र आता त्यांनाही चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. यात सगळ्यात जास्त चर्चा होती ती बॉण्डपट ‘नो टाईम टु डाय‘ या चित्रपटाची.. अभिनेता डॅनियल क्रे गची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट  युके मध्ये ८ एप्रिलला तर नॉर्थ अमेरिके त १० एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र करोनाचा वाढत गेलेला प्रादुर्भाव लक्षात घेत हा चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. करोनाचा धोका नेमका कधी टळणार आणि जगभरातील परिस्थिती कधी निवळणार याबद्दल अजून भाकित करणे कठीण आहे. त्यामुळे आता पुढे ढकलले गेलेले चित्रपट नेमके  कधी प्रदर्शित करायचे याबद्दलही एकच गोंधळ आहे. ‘नो टाईम टु डाय‘ हा डॅनियल क्रे गबरोबर सुरु झालेल्या या बॉण्डपट मालिके तील पाचवा आणि क्रे गची भूमिका असलेला अखेरचा बॉण्डपट आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल जगभरातील बॉण्डपटाच्या चाहत्यांना उत्सूकता आहे. किं बहूना चाहत्यांच्या दोन संके तस्थळांनी सद्यस्थितीत चित्रपट प्रदर्शित करू नये, उशिराने तो प्रदर्शित व्हावा, अशी विनंती निर्मात्यांना के ली होती. या सगळ्याचा विचार करत एक नाही दोन नाही तब्बल सात महिन्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा चित्रपट युके मध्ये १२ नोव्हेंबरला तर युएसमध्ये २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अर्थातच, सध्या पुढे गेलेल्या चित्रपटांमुळे एकू णच जगभरातील चित्रपट प्रदर्शनाचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. त्यामुळे एके का आठवडय़ात तीन-चार चित्रपट प्रदर्शित करण्याची नामुष्की सगळ्याच निर्माते-दिग्दर्शकांवर ओढवली आहे. ‘नो टाईम टु डाय‘ हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. विल स्मिथची मुख्य भूमिका असलेला वॉर्नर ब्रदर्सचा ‘किं ग रिचर्ड‘, डिस्नेचा ‘राया अ‍ॅण्ड द लास्ट ड्रॅगन‘ आणि सोनी पिक्चर्सचा ‘द हॅप्पीएस्ट सीझन‘ या तीन चित्रपटांबरोबर हा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित बॉण्डपट प्रदर्शित होणार आहे.