करोनावरून एकूणच बॉलीवूड मंडळींमध्ये गडबड-गोंधळाचेच वातावरण पाहायला मिळते आहे. एकीकडे आघाडीच्या अनेक कलाकारांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत स्वत:ला घरात बंद करून घेतले आहे. चित्रीकरणच रद्द झाल्यामुळे मिळालेली सुट्टी ते घरातील कपाट आवरण्यापासून वेबसीरिज पाहण्यापर्यंत अनेकविध गोष्टी करण्यात घालवत आहेत. अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षितसह अनेक कलाकार असे आहेत जे आपापल्या समाजमाध्यमांवरून प्रेक्षकांना करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी यासंदर्भात आवाहन करत आहेत. एकीकडे इतके काळजीने वावरणारे कलाकार, तर दुसरीकडे गायिका कनिका कपूरसारखे सेलेब्रिटीही आहेत जे आपल्या एकं दरीतच बेफिकीर स्वभावामुळे दुसऱ्याचा जीवही धोक्यात घालत आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असतानाच जगभरात बॉलीवूड कलाकार आणि त्यांची मुले-मुली विखुरले गेले आहेत. इरफान खानचा मुलगा बाबिलही लंडनमध्ये अडकू न पडला होता. तो शिक्षणासाठी लंडनमध्ये होता, मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर तो आता भारतात परतला आहे. उशिरा का होईना आपला मुलगा घरी परतला आहे, याबद्दल इरफानची पत्नी सुतापा यांनी समाजमाध्यमांवरून एकीकडे आनंद व्यक्त के ला, तर दुसरीकडे आपल्याला सांगितलं जातं आहे त्या पद्धतीने विमानतळावर परदेशातून येणाऱ्यांची कसून तपासणी के ली जात नाही आहे का? अशी शंकाही व्यक्त के ली. लंडनहून परतलेल्या आपल्या मुलाला आपण मिठी मारली नाही की जवळ घेतलंही नाही. त्याची विमानतळावर थर्मल चाचणी घेण्यात आली, फॉर्म भरून घेऊन त्याला सोडण्यात आलं. सुतापा यांनी मात्र आपल्या मुलाबरोबरच त्याच्यामुळे इतरांनाही त्रास होऊ नये यासाठी विमानतळावरून दोन स्वतंत्र गाडय़ा के ल्या. वाहनचालकांसाठी खबरदारी घेण्यात आली होती आणि आता त्यांनी आपल्या मुलाला एका स्वतंत्र खोलीत वेगळे ठेवले आहे. एकीकडे आपण इतकी काळजी घेतो आहोत, मात्र आपल्या मुलाला पुन्हा एकदा तपासणीसाठी बोलावले जाईल, असा त्यांचा अंदाज होता तो मात्र खोटा ठरला असल्याचे मत त्यांनी व्यक्त के ले आहे. आपण उगाचच बागुलबुवा तर करत नाही ना? असाही विचार आपल्या मनात येऊन गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. अभिनेत्री मिथिला पालकरही याचदरम्यान ऑस्ट्रेलियात सुट्टीसाठी गेली होती. तिनेही मायदेशात परतल्यावर स्वत:ला घरच्यांपासून दूर ठेवले आहे. गेले चौदा दिवस ती एकटी राहते आहे, तर चित्रीकरणासाठीच जॉर्जियात असलेली पूजा हेगडे मात्र करोनाच्या चिंतेपासून दूर राहत आजूबाजूच्या वातावरणाची मजा घेताना दिसते आहे. एकू णच बॉलीवूडमध्ये करोनावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले दिसते आहे.

शाहरूख सध्या काय करतो?

शाहरूख खान रुपेरी पडद्यापासून गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ दूर आहे. २०१८ साली त्याचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तिकीटबारीवर सपशेल मार खाल्ला, पण याचा अर्थ त्याचा अभिनय टुकार होता, असे म्हणणे चुकीचे ठरेल. शाहरूखने या चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेतली होती. या चित्रपटानंतर मात्र शाहरूखने आता आपल्याला काही काळ आराम करायचा आहे, घरच्यांबरोबर वेळ घालवायचा आहे, असे सांगत स्वत:ला चित्रपटांपासून दूर ठेवले आहे. तो वारंवार माध्यमांसमोर हे सांगत आला आहे की, या दरम्यानच्या काळात त्याने अभिनेता म्हणून एकही चित्रपट करारबद्ध के लेला नाही. तो घरच्यांना वेळ देतो आहे.. एवढे सांगूनही हा सुपरस्टार सध्या काय करतो आहे, याबद्दल चाहत्यांची उत्सुकता काही शमत नाही आहे. अखेर शाहरूखने आणखी काही पत्ते उघड के ले आहेत. एका अर्थी तो चित्रपटांपासून दूर आहे, पण तो खरोखरच पूर्णपणे चित्रपटांपासून दूर झालेला नाही, हेही तितकं च खरं आहे. सध्या तो खूप नवनवीन पटकथा वाचण्यावर भर देतो आहे. अभिनयापेक्षा एका उत्तम चित्रपटनिर्मितीचा ध्यास त्याने घेतला आहे आणि त्यासाठीच तो वेळ घेऊन काम करतो आहे. शाहरूख लवकरच एका वास्तव घटनेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं समजतं. मुझफ्फरपूर येथील अनाथाश्रमात मुलींवर बलात्कार झाल्याची, अनेकींना मारून तिथेच पुरण्यात आल्याची मोठी घटना उघडकीस आली होती.

या विषयावर ‘सुभाषचंद्र बोस’ या वेबसीरिजचा दिग्दर्शक पुलकित चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा शाहरूखने स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. २०१८ मध्ये ही अमानुष घटना उघडकीस आली होती. त्यानंतर या घटनेवर दिग्दर्शक पुलकितने खूप संशोधन के ले आहे. संशोधन आणि अभ्यासातून त्याने पटकथा लिहिली असून यात पत्रकार मुख्य भूमिके त असणार आहे. जुलै महिन्यात साधारणपणे याचे चित्रीकरण सुरू होईल. त्यामुळे अभिनेता म्हणून नव्हे तर निदान निर्मात्याच्या भूमिके तून का होईना शाहरूख पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांशी जोडला जाणार आहे हेही नसे थोडके !