करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून त्याची झळ आता चित्रीकरणांनाही बसू लागली आहे. हिंदीतील मोठय़ा कलाकारांना करोनाची लागण होत असल्याने सध्या मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरण स्थळांवर संघटनांची देखरेख वाढली आहे.

गुरूवारी रात्री ‘गंगूबाई काठियावाडी’च्या सेटवर असतानाच आपण करोनाबाधित असल्याचा अहवाल अभिनेत्री अलिया भटच्या हाती पडला. परिणामी, पुढचे काही दिवस कोणत्याही तंत्रज्ञ-कामगारांनी या सेटवर काम करू नये, असे आवाहन ‘एफडब्ल्यूआयसीई’ या संघटनेने केले आहे. सध्या पाच लाख कामगार आणि तंत्रज्ञ वेगवेगळ्या चित्रीकरण स्थळांवर काम करीत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापुढे जिथे जिथे चित्रीकरण सुरू आहे तिथल्या परिस्थितीवर जातीने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.

‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (एफडब्ल्यूआयसीई)चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी सांगितले की, या आमच्या संघटनेंतर्गत अभिनय, नृत्य, कॅमेरा-साऊंड असे विविध विभाग सांभाळणाऱ्या ३२ संघटना कार्यरत आहेत आणि एकूण पाच लाख कामकार-तंत्रज्ञ सध्या वेगवेगळ्या चित्रीकरण स्थळांवर (सेट) काम करीत आहेत. त्या-त्या संघटनांचे सदस्य आणि कार्यरत  कर्मचारी यांच्या सतत संपर्कात राहून आम्ही सातत्याने आढावा घेत आहोत. एखाद्या स्थळी करोना संसर्गाबाबत काहीही जाणवल्यास संबंधित निर्मात्यांना सूचित केले जाते.

याआधी अभिनेत्री गौहर खान हिने करोना नियमाचा ड्टांग के ल्याने तिच्या कामावर आम्ही अंशत: बंदी आणली होती. यापुढे आमची काही पथके  सातत्याने निर्माते आणि कामगारांच्या संपर्कात राहून यावर देखरेख करणार आहोत, असे तिवारी यांनी स्पष्ट केले.

फाईट मास्टर इक्बाल सुलेमान शेख म्हणाले की, सध्या करोनासंबंधीचे सगळे नियम निर्मितीसंस्थांकडून पाळले जातात. आमचे फाईट मास्टर्स किं वा कनिष्ठ कलावंत आदींची चित्रीकरण स्थळी इतरांप्रमाणे रोजच्या रोज तपासणी के ली जाते. दुसऱ्या देशात किं वा अन्य राज्यात चित्रीकरणासाठी जायचे असेल तर करोना चाचणी के ली जाते आणि मगच चित्रीकरणाच्या चमूत सहभागी करून घेतले जाते. त्यातही काही अडचणी आल्या तर आम्ही निर्मात्यांशी संपर्क साधतो.

करोनामुळे सेटवर काम करणाऱ्या नृत्य कलावंतांना आता ३० टक्के च काम मिळत आहे. संबंधित चित्रपटांचे निर्माते या कलावंतांची काळजी घेतात. सुरक्षेच्या बाबी सांभाळूनच काम के ले जात असल्याने आता तरी चित्रीकरणावर बंदी आणू नये, अशी विनंती वरिष्ठ नृत्य कलावंत झाहिद शेख यांनी के ली.

लसीकरणासाठी तयार

२५ जूनपासून दूरचित्रवाहिन्यांचे चित्रीकरण सुरू झाले. तेव्हापासून हिंदी-मराठी मिळून मुंबई आणि  परिसरात शंड्टार मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. रोजच्या रोज १२ ते १५ हजार लोक चित्रीकरण स्थळांवर काम करत आहेत. करोना संबंधिचे सगळे नियम पाळून चित्रीकरण के ले जाते आहे ना, याकडे आमच्या निर्मात्यांच्या संघटनांसह कामगार संघटनाही लक्ष ठेवून आहेत. कोणी यात कमी पडले तर आपापसात तातडीने संपर्क साधून कार्यवाही के ली जाते, अशी माहिती निर्माते नितीन वैद्य यांनी दिली. राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केलीच तर नागरिकांना घरात बसवून ठेवण्याची क्षमता टेलीव्हिजन माध्यमाक डे आहे. ही बाब लक्षात घेऊन तरी सरकारने चित्रीकरणावर बंदी घालू नये. सगळे निर्माते टप्प्याटप्प्याने का होईना सगळ्या युनिटचे लसीकरण करण्यास  तयार आहोत,  लवकरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ड्टोट घेऊ, असे  वैद्य यांनी स्पष्ट के ले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

गेल्यावर्षी करोनाच्या प्रादुड्टरावामुळे चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली. चित्रपट क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्यांना घरी बसावे लागले. सुरूवातीला काही कलाकार-निर्मात्यांनी आर्थिक मदत के ली, पण नंतर घरखर्च कसा ड्टाागवायचा?  हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर होताच. अनेकांनी आपल्या गावची वाट धरली. आत्ता कु ठे त्यांना हळूहळू काम मिळू लागले आहे, त्यामुळे पुन्हा चित्रीकरणांवर बंदी घालू नये, असे आवाहन लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना करण्यात आले असल्याची माहिती तिवारी यांनी दिली. आम्ही करोना संबंधिचे सगळे नियम पाळून काम करीत आहोत, त्यामुळे चित्रीकरणस्थळी काम करणाऱ्या एकाचाही करोनामुळे मृत्यू झालेला नाही. यापुढेही असेच काटेकोरपणे काम के ले जाईल, असे आश्वासनही या पत्रात देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.