News Flash

घरातून बाहेर पडल्यामुळे सुनील ग्रोवरला पोलिसांचे फटके? भन्नाट मीम व्हायरल

सुनीलने शेअर केलं मीम

करोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. तसंच गरजेशिवाय घराच्या बाहेर पडू नका, असं आवाहनही सरकारकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोणीही विनाकारण घराबाहेर पडणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी गावात, शहरात, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे कामाव्यतिरिक्त कोणी घराबाहेर पडल्यास पोलीस त्याला चांगलाच चोप देत आहेत. यामध्ये लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता सुनील ग्रोवरलादेखील पोलिसांचे फटके पडल्याचं दिसून येत आहे.

पोलीस ज्या पद्धतीने त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. त्याचं कौतुक साऱ्यांनाच आहे. मात्र तरीदेखील काही भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. यात सुनील ग्रोवरला पोलिसांना मारल्यांच एक मीम व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही मीम सुनीलने स्वत: त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Ha ha Stay at home for God sake.

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover) on

सुनीलने शेअर केलेल्या मीममध्ये तो घरातून बाहेर पडल्यावर त्याला पोलीस कसं मारतायेत हे दाखवलं आहे. हे मीम शेअर करुन ‘हाहाहा.. देवकृपेकरुन घरातचं रहा’, अशी कॅप्शन सुनीलने या फोटाला दिली आहे.

दरम्यान, आतापर्यंत या मीमला दीड लाखांपेक्षा जास्त जणांनी लाईक आणि शेअर केलं आहे. सध्या देशात लॉकडाउन असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी सध्या घरीच आहेत. या फावल्या वेळात त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:58 pm

Web Title: corona virus lockdown sunil grover meme viral police lathi ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनापासून वाचण्यासाठी अभिनेत्री डोक्यात घातली चक्क प्लास्टिकची पिशवी, पाहा भन्नाट व्हिडीओ
2 प्रकाश राज यांनी वयाने १२ वर्ष लहान कोरिओग्राफरशी केलंय लग्न
3 ‘घरचं सामान घेऊन जाणाऱ्यालाही मारणं योग्य आहे का?’; दिग्दर्शकाचा संतप्त सवाल
Just Now!
X