21 January 2021

News Flash

कोरोनाची दहशत, मलाइका अरोराने शेअर केला बदलेला लुक

बॉलिवूड कलाकरांच्या मनातही कोरोना व्हायरसची दहशत निर्माण झाली आहे हे या पोस्टवरुन लक्षात येतं आहे

मलाइका अरोरा फोटो सौजन्य- इंस्टाग्राम

कोरोनाची दहशत आपल्या देशात पसरु लागली आहे. सामान्यांच्या मनात या कोरोना व्हायरसची दहशत तर आहेच. शिवाय आता अभिनेत्री मलाइका अरोरानेही तिचा लुक बदलला आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या मलाइका अरोरा हिने तिच्या इंस्टाग्राम स्टेटस बदललं आहे.

मलाइकाचं इंस्टाग्राम स्टेटस

या स्टेटसमध्ये एअरपोर्ट फॅशनशी संबंधित एक फोटो पोस्ट करुन खिल्ली उडवली आहे. २०१९ चा एअरपोर्ट लुक आणि २०२० चा लुक मलाइकाने शेअर केला आहे. २०१९ च्या फोटोमध्ये मलाइका कुल अंदाजात दिसते आहे. तर २०२० च्या फोटोमध्ये तिचा लुक पूर्ण बदलून गेला आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव व्हावा म्हणून चेहऱ्यावर मास्क असलेला आणि पूर्ण बंद असलेला ड्रेसचा फोटो मलाइकाने शेअर केला असून खिल्ली उडवली आहे. आता तिने हा फोटो गंमत म्हणून शेअर केला असला तरीही बॉलिवूड कलाकरांच्या मनातही कोरोना व्हायरसची दहशत निर्माण झाली आहे आणि तेही जास्तीची काळजी घेऊ लागले आहेत हे उघड आहे. तिने शेअर केलेल्या या मीमवर अद्याप काही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 9:24 pm

Web Title: corona virus malika arora shares meme on airport fashion scj 81
Next Stories
1 कोरोनाचा कहर! उत्तर प्रदेशात आढळले सहा संशयित
2 मोदीजी सोशल मीडियावरचे विदुषकी खेळ थांबवा : राहुल गांधी
3 दिल्ली हिंसाचारावरुन विरोधकांना सरकारचा राजीनामा मागण्याचा अधिकार : संजय राऊत
Just Now!
X