News Flash

कामसूत्र फेम ‘या’ अभिनेत्रीला झाली करोनाची लागण

अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहीती दिली आहे

बॉलिवूडमधील चर्चेतील चित्रपट कामसूत्र आणि हॉलिवूडमधील ‘गेम ऑफ थ्रोन’ या सीरिजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून इंदिरा वर्मा आहे. नुकताच इंदिराने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

बुधवारी इंदिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. तिने ही पोस्ट शेअर करत ‘मला या आजारामुळे आराम करावा लागत आहे आणि ही चांगली गोष्ट नाही’ असे लिहिले होते. तसेच इंदिराने चाहत्यांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले आहे.

४६ वर्षांची इंदिरा सध्या Anton Chekhov यांच्या एका नाटकात काम करत आहे. The Seagull या नाटकाचे हे नवे वर्जन आहे आणि या नाटकाचे काम लंडन येथे सुरु आहे. या नाटकात इंदिरासोबत ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मधील अभिनेत्री एमेली क्लार्क देखील आहे. इंदिराने १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘कामसूत्र’ हा चित्रपटात रेखासोबत काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 5:09 pm

Web Title: corona virus one more kamasutra fem indira varma tests positive for coronavirus avb 95
Next Stories
1 जेव्हा सलीम खान यांनी सांगितलं होतं सलमानच्या फसलेल्या रिलेशनशिप्समागील खरं कारण
2 शिवा होऊ देईल का सोनी-सरकारचं लग्न?
3 ते २४ तास वेड लावणारे होते, करोनाग्रस्त अभिनेत्याने सांगितला अनुभव
Just Now!
X