करोना व्हायरसमुळे देशभरातील लोक त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान काही सेलिब्रिटी मंडळी स्वत: पुढे येऊन करोनाशी सामना कसा करायचा याबाबत प्रबोधन करत आहेत. मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे हिने एका व्हिडीओच्या माध्यमातून करोनापासून सुरक्षित राहण्याचे उपाय सांगितले आहेत.

काय म्हणाली अमृता?

मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुमी म्हणजेच अमृता हिने एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

take care and say Go Corona @zeemarathiofficial @mrsmukhyamantrioff

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongadeofficial) on

“करोना विषाणूने जगभरात थैमान घातला आहे. एका कडून दुसऱ्याला आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याला या विषाणूचा संसर्ग सुरुच आहे. मात्र यापेक्षा जास्त हानिकारक करोना विषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवा आहेत. त्यामुळे जागरुक राहा आणि करोना विषयीची कुठलीही अर्धवट माहिती पसरवू नका. कारण यामुळे जनमानसात भिती पसरते. भिती ही विषाणूपेक्षा जास्त घातक आहे.” असा सल्ला अमृताने आपल्या चाहत्यांना दिला आहे.