देशभरातील लोक सध्या करोना विषाणूमुळे त्रस्त आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने देशभरात संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. मात्र संचारबंदी असतानाही दिल्लीतील शाहीन बाग येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (CAA) आंदोलन सुरुच होते. हे आंदोलन दिल्ली पोलिसांची अखेर स्थगित केले आहे. या प्रकारावर बॉलिवूड अभिनेता अशोक पंडित यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अशोक पंडित?

पनौती हटी !

ग्रहण हटा !

जहर हटा !

देश के दुश्मन हटे !

अब #Coronavirus भी हटेगा !

करोना व्हायरस येण्यापूर्वी CAAचा मुद्दा देशभरात चर्चेत होता. अगदी सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्व स्तरातील लोक यावर आपली मते बिनधास्तपणे मांडत होती. शाहीन बागमध्ये तर CAAच्या आंदोलनाने हिंसात्मक रुप घेतले होते. या पार्श्वभूमीवर अशोक पंडित यांचे हे वादग्रस्त ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.