जगभरात सध्या करोना विषाणूने थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्माला आलेल्या या विषाणूने जगभरातील हजारो लोकांचे प्राण घेतले आहेत. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अभिनेता आयुषमान खुरानाचे एक ट्विट सध्या चर्चेत आहे. “आता श्रीमंतांचा प्रत्येक दिवस रविवार असेल आणि गरीब मात्र सोमवारची वाट बघत असेल.”

काय म्हणाला आयुषमान?

आयुषमानने एक चारोळी ट्विट केली आहे. या चारोळीत त्याने गरीबांची तुलना श्रीमंत लोकांच्या जीवशैलीशी केली आहे. “आता श्रीमंतांसाठी प्रत्येक दिवस रविवार असेल आणि गरीब मात्र सोमवारची वाट बघत असेल. आता श्रीमंतांसाठी प्रत्येक दिवस कुटुंबासोबत असेल आणि गरीब मात्र रोजगाराच्या शोधात असेल.” अशा आशयाची चारोळी आयुषमानने ट्विट केली आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयुषमानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी आयुषमानच्या या चारोळीची तोंड भरुन स्तुती देखील केली आहे.