‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या काही काळात ते आपल्या चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडिया पोस्टमुळे जास्त चर्चेत राहू लागले आहेत. नुकतेच त्यांनी करोना व्हायरसबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी करोनाची तुलना चक्क बाहुबलीशी केली आहे.

काय म्हणाले राम गोपाल वर्मा?

राम गोपाल वर्मा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नागरिकांची लांबच लांब रांग दिसत आहे. अमेरिकन लोकांनी खरेदी करण्यासाठी शॉपिंग मॉलसमोर लावलेली ही रांग आहे. या रांगेची तुलना त्यांनी ‘बाहुबली २’ चित्रपटाचं तिकिट घेण्यासाठी लावलेल्या रांगेशी केली आहे.

करोना विषाणूने भारताप्रमाणेच अमेरिकेत देखील थैमान घतलं आहे. करोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी अमेरिकन सरकारने शॉपिंग मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे मॉल केवळ ठराविक वेळेत सुरु केले जातात. त्यामुळे सामान विकत घेण्यासाठी अमेरिकन लोकांनी ही लांबच लांब रांग लावल्याचे दिसत आहे.