News Flash

मुलांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी संगीतकाराने स्वत:ला केले काचेच्या पेटीत बंद

वेड्या बापाची वेडी माया; संगीतकारानं स्वत:ला केलं काचेच्या पेटीत बंद

जगभरातील सेलिब्रिटी करोना विषाणूच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी विलगीकरण कक्षात राहिले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या विशेष खोल्या त्यांनी आपल्या घरातच तयार करुन घेतल्या आहेत. या यादीत आता संगीतकार डीजे डिपलो याचे देखील नाव जोडले गेले आहे. अमेरिकन संगीतकाराने करोनाच्या प्रादुर्भावापासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी स्वत:ला काचेच्या पेटीत बंद करुन घेतले आहे.

डिपलो गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत आहे. मात्र ही सर्व करोना विषाणूची लक्षण असल्याचं त्याला वाटत आहे. त्याच्यामुळे मुलांना कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये म्हणून त्याने सुरुवातीला स्वत:ला एका खोलीत कोंडून ठेवले होते. मात्र त्याचे आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे. तो आपल्या मुलांना पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्याने मुलांपासून दूर राहूनही त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी एक अनोखी युक्ती शोधून काढली. डिपलोने चक्क एक काचेची खोलीच तयार करुन घेतली. या खोलीमधून तो आपल्या मुलांना सतत पाहू शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Thomas Wesley (@diplo) on

डीजे डिपलोने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. डिपलोचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. अनेकांनी त्याचे तोंड भरुन कौतुक देखील केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 11:56 am

Web Title: coronavirus dj diplo self isolation emotional video mppg 94
Next Stories
1 Coronavirus : घरी बसून कंटाळलात? आता ओटीटी प्लॅटफॉर्म देतोय फ्री सबस्क्रिप्शन
2 गुरुनाथला महागात पडणार ‘माया’जाल; राधिका-शनायाने आखला नवा डाव
3 कियारा अडवाणीची पाकिस्तानमध्येही क्रेझ; ‘या’ अभिनेत्रीने केली तिची कॉपी
Just Now!
X