X
X

‘करोना’बाबत अमिताभ बच्चन यांचा दावा चुकीचा, आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

READ IN APP

चुकीची माहिती दिल्यामुळे सोशल मीडियावर अमिताभ बच्चन ट्रोल...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दोन दिवसांपूर्वी करोना व्हायरसबाबत केलेला दावा आरोग्य मंत्रालयाकडून फेटाळण्यात आला आहे. माश्यांमुळे करोनाचा प्रादुर्भाव होत नाही असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी गुरूवारी (दि.२६) दिले. अमिताभ बच्चन यांनी माश्यांमुळे करोनाचा प्रसार होतो, असा दावा केला होता.

२५ मार्च रोजी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर करोनाबाबत माहिती देणारा आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करणारा एक व्हिडिओ ट्विटरद्वारे शेअर केला. यामध्ये, “करोनाचा रुग्ण बरा झाल्यानंतरही काही आठवड्यांपर्यंत त्याच्या विष्टेत करोनाचे विषाणू असतात. हे विषाणू अनेक दिवस जिवंत राहू शकतात. अशा विष्टेवर बसलेल्या माश्यांमुळे करोनाचा प्रसार वाढू शकतो, त्यामुळे शौचालयांचा उपयोग करा”, असं अमिताभ म्हणाले होते. याबाबत बोलताना, ‘अमिताभ बच्चन यांनी काय ट्विट केलंय याची कल्पना नाही. मात्र, करोना व्हायरसचा प्रादुर्भाव माश्यांद्वारे होत नाही’, असं आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर बच्चन यांनी ते ट्विट डिलीट केलं आहे.

दरम्यान, करोनाबाबत चुकीची माहिती दिल्यामुळे आता सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना जोरदार ट्रोल केले जात आहे.

22
X