चीनमधील वुहानमधून जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. चीनमध्ये या विषाणूमुळे तीन हजारहून अधिक जणांना प्राण गमवावा लागला आहे. चीनबरोबरच इतर ९० हून अधिक देशांमध्ये हा विषाणू पसरला आहे. संपर्कातून पसरणाऱ्या या रोगापासून बचावण्यासाठी प्रशासनाने शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहिर केली आहे. तर काही कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले आहे. तसेच कामा शिवाय घरातून बाहेर पडू नका, खोकताना आणि शिंकतान रुमालाचा वापर करा, हात स्वच्छ साबणाणे धूवावेत किंवा सॅनेटाझरचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. अशात सर्व चित्रपटांचे चित्रीकरण देखील रद्द करण्यात आले आहे. मग हे सेलिब्रिटी घरात बसून काय काम करतात? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

नुकताच सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान सध्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. सलमान त्याच्या बहिणीचा मुलगा अहिलसोबत बागेत फिरताना दिसत आहे. तसेच तो आणि अहिल तेथे झाडाची फळे तोडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहता यामध्ये सलमान स्टार नाही तर एखाद्या सामान्य माणसांप्रमाणे दिसत आहे.

सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सलमान नेहमी क्यूट अहिलसोबत फोटो शेअर करताना दिसतो. आता मिळालेला वेळ तो अहिलसोबत घालवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने चित्र काढतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्याने एका पेपरवर दोन महिलांचे सुंदर स्केच बनवले होते. त्याने काढलेल्या स्केचचे चाहत्यांनी कौतुक केले होते.