30 May 2020

News Flash

Fact Check: करोनाशी लढण्यासाठी आमीर खानकडून २५० कोटींची मदत?

अक्षय कुमारने २५ कोटींची मदत केल्यानंतर आता आमीर खानच्या नावाची चर्चा सुरु आहे

आमिर खानने अभिनयाआधी सह दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. यासाठी त्याला १००० रूपयांतं मानधन मिळलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केल्यानंतर अनेक संस्था, उद्योजक, सेलिब्रेटी मदतीसाठी पुढे येत आहेत. बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर काही वेळातच २५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानची चर्चा सुरु आहे. आमीर खानने करोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे २५० कोटींची मदत दिल्याचा दावा केला जात आहे. आमीर खानचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, आमीर खानने २५० कोटींची मदत केली. या व्हिडीओत आमीर खान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हस्तांदोलन करत असून दोघेही बसून गप्पा मारत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओला चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

पण व्हिडीओची माहिती पडताळून पाहिली असता हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ सहा वर्ष जुना आहे. आमीर खानने २३ जून २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली होती.

आमीर खानच्या या भेटीमागे काही खास कारण नव्हतं. यावेळी आमीर खान आपला टीव्ही शो सत्यमेव जयतेची डीव्हीडी घेऊन आला होता. महत्त्वाचं म्हणजे आमीर खानने त्यावेळी या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारं ट्विटदेखील केलं होतं.

त्यामुळे आमीर खानने २५० कोटींची मदत केल्याचा दावा खोटा आहे. सोबतच हा व्हिडीओ सहा वर्ष जुना असल्याचं समोर आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 11:23 am

Web Title: coronavirus fact check bollywood actor amir khan donates 250 crore sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 VIDEO : घरी बसून कंटाळलात? हे शिका… नवं काहीतरी!
2 लाल चिखल! …म्हणून त्या शेतकऱ्याने तीन हजार किलो टोमॅटो तळ्याकाठी फेकून दिले
3 हार्दिक-नताशाचा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल… “व्यायाम तर केलाच पाहिजे’
Just Now!
X