News Flash

करोनावरील पहिला चित्रपट प्रदर्शित; पाहून अंगावर येईल काटा

वाचा, कुठे पाहता येईल हा चित्रपट

करोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. हा विषाणू पसरु नये यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउनही करण्यात आलं आहे. त्यामुळे सहाजिकचं या साऱ्याचा परिणाम व्यवसाय, उद्योग-धंद्यावर झाला आहे. तसंच कलाविश्वातील कामकाजही ठप्प आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये एकही नवीन चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. याच कारणामुळे घरात बसून प्रत्येक नागरिक कंटाळला आहे. मात्र लॉकडाउन असतानाही या काळात खास प्रेक्षकांसाठी एक नवा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट करोनावर आधारित आहे.

‘द गार्डियन’नुसार, जगात करोना विषाणूने उच्छाद मांडला आहे. या विषाणूनमुळे आतापर्यंत अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळेच सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या ‘करोना झॉम्बीज’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून या चित्रपटाचं दिग्दर्शन चार्ल्स बँड यांनी केलं आहे. हा चित्रपट ‘फूल मून फीचर्स’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटामध्ये जगातील परिस्थिती आणि करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मृत्युमुखी पडलेले लोक मरणानंतर झॉम्बी होतात असं या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. या चित्रपटामध्ये कोडी रेनी कॅमरन, रसेल कोकर, रॉबिन सिडनी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. दरम्यान, हा भयपट असून हा चित्रपट तयार करण्यासाठी  ‘हॅल ऑफ द लिव्हिंग डेड’ आणि ‘झॉम्बीज’ vs स्ट्रिपर्स’ या चित्रपटातील काही फुटेज वापरण्यात आले आहेत. इतकंच नाही तर या चित्रपटाचं २८ दिवसांमध्ये चित्रीकरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2020 1:28 pm

Web Title: coronavirus first film on coronavirus corona zombies released charles band ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘महाभारत’च्या कलाकारांना मिळायचं एवढं मानधन, रक्कम ऐकून बसणार नाही विश्वास
2 “अखेर न्याय मिळाला”; तुरुंगातून सुटताच अभिनेत्याने केले ट्विट
3 बॉबी देओलचे चाहते झाले ‘बॉबियन्स’; पाहा भन्नाट मीम्स
Just Now!
X