News Flash

Coronavirus : हिंदू महासभेच्या ‘गोबर पार्टी’वर अनुराग कश्यपने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…

करोना व्हायरस पळवण्यासाठी केले गोबर पार्टीचे आयोजन

करोना विषाणूने सध्या जगभरात थैमान घतला आहे. जवळपास ९० देशांमध्ये हा व्हायरस पसरला आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र या घातक करोना विषाणूवासून बचाव करण्यासाठी हिंदू महासभेने एक नामी शक्कल लढवली. त्यांनी चक्क ‘गोमूत्र आणि गोबर पार्टी’चे आयोजन केले. या अनोख्या पार्टीवर आता बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला अनुराग?

“गोमूत्राचे सेवन केल्यास करोना व्हायरसची लागण होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गोमूत्र घेतात. आता आम्ही हे गोमूत्र अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना देखील पाठवणार आहोत.” असे दावे हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी या ‘गोमूत्र आणि गोबर पार्टी’त केले होते. त्यांच्या या पार्टीवर अनुरागने ‘अच्छे दिन’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अनुराग कश्यप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो आपली मते रोखठोकपणे मांडतो. अनेकदा त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही कडाडून टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर अनुराग कश्यप हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या गोबर पार्टीची खिल्ली देखील उडवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 11:07 am

Web Title: coronavirus hindu mahasabha gaumutra and gobar party anurag kashyap mppg 94
Next Stories
1 थिएटर बंद! मग बार व रेस्टॉरंटना का सूट?; विजू मानेंचा सवाल
2 जाणून घ्या, आलिया भट्टच्या प्रॉपर्टी व गुंतवणुकीबद्दल..
3 निलेश साबळे, भाऊ आणि कुशल विरोधात संभाजी ब्रिगेडची पोलिसात तक्रार
Just Now!
X