03 March 2021

News Flash

छोटय़ांवर मोठी मदार

कधी नव्हे ते सात-आठ महिने चित्रपटसृष्टीचे काम ठप्प झाले.

रणवीर सिंग, वरुण धवन, अक्षय कुमार, अजय देवगण ही सगळी मोठी मंडळी आणि त्यांचे चित्रपट यांनी एरव्ही २०२० हे वर्ष गाजवले असते, पण करोनाचा फटका बसला. कधी नव्हे ते सात-आठ महिने चित्रपटसृष्टीचे काम ठप्प झाले.

चित्रपटगृहे काळोखात बंद झाली आणि सगळे चित्रच बदलले. आता या मोठय़ा कलाकारांचे चित्रपट एकतर पुढे ढकलले गेले आहेत किं वा ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित झाले आहेत. या सगळ्यात खरी अडचण झाली आहे ती चित्रपटगृह व्यावसायिकांची. आठ महिन्यांनंतर चित्रपटगृह सुरू करायची परवानगी मिळाली, नवी सुरुवात करायलाच हवी म्हणून अनेकांनी परवडत नसतानाही चित्रपटगृहांची दारे उघडली, पण आता प्रेक्षकांना दाखवायचे काय? सध्या तरी छोटय़ा बजेटचे चित्रपट किं वा बॉलीवूडच्या तथाकथित दुसऱ्या फळीतील कलाकारांचे चित्रपट चित्रपटगृहांच्या मदतीला धावून आले आहेत. सरत्या वर्षांत एकच महिना व्यवसाय करण्यासाठी हातात असताना खऱ्या अर्थाने त्यांची मदार ही या छोटय़ा चित्रपटांवर असणार आहे.

करोना नसता आणि सगळे काही आधीप्रमाणे सुरळीत सुरू राहिले असते तर मोठय़ा कलाकारांच्या चित्रपटांनी देशभरातील चित्रपटगृहे बळकावली असती. आणि मग इतर चित्रपटांना किमान महत्त्वाच्या शहरांमधून शोज मिळावेत, यासाठी धडपड करावी लागली असती. आता मात्र अगदी उलट चित्र निर्माण झाले आहे. छोटय़ा बजेटचे चित्रपट असोत, नावाजलेल्या कलाकारांचे चित्रपट नसले तरी चित्रपटगृह मालक स्वत:हून अशा नवीन चित्रपटांसाठी विचारणा करत आहेत. तुलनेने छोटय़ा बजेटच्या चित्रपटांसाठी हा खूप चांगला काळ आहे, अशी माहिती ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांनी दिली. नोव्हेंबर महिन्यात फार झगडा करूनही ‘सूरज पे मंगल भारी’ आणि ‘खाली पिली’ असे दोनच नवीन चित्रपट चित्रपटगृहांच्या हाती लागले. त्यात ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट निर्मात्यांनीच निवडक ठिकाणी लावला, तर ‘खाली पिली’ हा चित्रपट ओटीटीवर आधी दाखवण्यात आला असल्याने बहुपडदा चित्रपटगृहांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे हाही चित्रपट फार कमी चित्रपटगृहांतून प्रदर्शित झाला आहे. अशा परिस्थितीत सगळ्यांचे लक्ष आता ११ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘इंदु की जवानी’ या चित्रपटाकडे लागले आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार प्रसिद्धी सुरू आहे, चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर देशभरात मोठय़ा प्रमाणावर प्रदर्शित होणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरणार आहे.

फेब्रुवारी-मार्चपर्यंत छोटय़ा चित्रपटांची रांग

तद्दन व्यावसायिक म्हणावा असा या वर्षीचा अजून प्रदर्शित न झालेला मोठा चित्रपट म्हणून ‘कु ली नं. १’ या रिमेकपटाचा उल्लेख करावा लागेल. मात्र हा चित्रपट नाताळच्या मुहूर्तावर अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. रिलायन्सने ‘८३’ आणि ‘सूर्यवंशी’ हे दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित करणार असल्याचे जाहीर के ले असल्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणेल असा एकही मोठा चित्रपट डिसेंबरमध्ये तरी प्रदर्शित होणार नाही. ‘इंदु की जवानी’नंतर नाताळच्या आठवडय़ात आशुतोष गोवारीकर यांची निर्मिती असलेला ‘तुलसीदास ज्युनिअर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटातून अभिनेता राजीव कपूर २८ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत, तर अभिनेता संजय दत्त या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिके त आहे. याच दिवशी यशराज प्रॉडक्शनचा ‘बंटी और बबली २’ प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि नवोदित अभिनेत्री शर्वरी वाघ यांची मुख्य जोडी आहे. तर सैफ अली खान आणि राणी मुखर्जीही छोटेखानी भूमिके तून झळकणार आहेत. जानेवारीत प्रदर्शित होणाऱ्या चारही चित्रपटांपैकी ‘सायना’ हा बॅडमिंटनपटू सायना नेहवालवर आधारित चरित्रपट सोडला तर बाकी तिन्ही चित्रपट हे तुलनेने छोटय़ा कलाकारांचे आहेत. ‘सायना’ चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिके त आहे. भन्साळींची निर्मिती असलेला ‘ट्युस्डेज अ‍ॅण्ड फ्रायडेज’, उत्तर प्रदेशातील राजकारणावर आधारित ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ ज्यात अभिनेत्री रिचा चढ्ढा मुख्य भूमिके त आहे तर सूरज पांचोलीचा ‘टाइम टु डान्स’ हे चित्रपट जानेवारीत प्रदर्शित होणार आहेत. फे ब्रुवारीत सनी कौशल आणि नुसरत भरुचा जोडीचा ‘हृदंग’ आणि कु णाल कपूर-अमायरा दस्तूर जोडीचा ‘कोई जाने ना’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यातले बरेचसे चित्रपट हे टी सीरिजचे आहेत आणि सध्या चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर जी सवलतींची खैरात सुरू आहे त्याचा फायदा घेण्यासाठी आपले छोटय़ा बजेटचे चित्रपट लवकरच प्रदर्शित करण्याची टी सीरिजची योजना आहे.

‘टेनेट’ आणि ‘वंडर वुमन १९८४’ चा आधार?

ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित बहुचर्चित ‘टेनेट’ हा चित्रपट भारतात ११ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू या तिन्ही भाषेत प्रदर्शित होणाऱ्या या हॉलीवूडपटासाठी प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत येतील, असा वितरकांचा अंदाज आहे. पाठोपाठ ‘वंडर वुमन १९८४’ हा सिक्वलपटही नाताळमध्ये प्रदर्शित होणार आहे. तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘वंडर वुमन’ने भारतात जवळपास २५ कोटी रुपयांची कमाई के ली होती, त्यामुळे सिक्वललाही चांगला प्रतिसाद मिळेल, असा वितरकांचा अंदाज आहे.

रिलायन्सने ‘८३’ आणि ‘सूर्यवंशी’ हे आपले दोन्ही चित्रपट नवीन वर्षांत पहिल्या तिमाहीतच प्रदर्शित करायचे असल्याचे जाहीर के ले आहे. ‘८३’ हा २१ जानेवारीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे आणि ‘सूर्यवंशी’ मार्च महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हे दोन चित्रपट ठरल्यानुसार प्रदर्शित झाले तर अद्याप बंदच असलेली अनेक चित्रपटगृहेही जानेवारीत या चित्रपटाबरोबर नवीन सुरुवात करतील, अशी माहिती वितरक अंकित चंदीरामाणी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 2:36 am

Web Title: coronavirus impact on movie industry mppg 94
Next Stories
1 Video : ‘हे अत्यंत वेदनादायी’; सुशांतशिवाय परफॉर्म करताना अंकिता भावूक
2 ‘धर्मांतराला विरोध केल्याने आमचं नातं संपुष्टात आलं’; दिवंगत वाजिद खानच्या पत्नीचा खुलासा
3 कंगना रणौतचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रत्युत्तर, म्हणाली…
Just Now!
X