News Flash

लॉकडाउनमध्ये रंगणार पुरस्कार सोहळा? जाणून घ्या, कुठे आणि कधी

आयोजकांनी भन्नाट कल्पना शोधून काढली आहे

करोनामुळे देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांपासून ते कलाविश्वापर्यंत सारं काही बंद आहे. मात्र या बंदच्या काळातही छोट्या पडद्यावरील एका पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार सोहळा लॉकडाउनमध्ये पार पडणार असून आयोजकांनी एका भन्नाट कल्पनेच्या आधारावर या सोहळ्याचं आयोजन केलं आहे. त्यामुळे या सोहळ्यात प्रत्येक कलाकार घरात बसून हजेरी लावणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अनेक पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करण्यात येतं. यात विविध पुरस्कारांनी कलाकारांना गौरविण्यात येतं. मात्र सध्या लॉकडाउन असल्यामुळे सारं काही बंद आहे. त्यामुळे अनेक कलाविश्वात रंगणारे मोठमोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र या बंदच्या काळातही कलाकारांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून गोल्ड क्वारंटाइन अवॉर्ड्स या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

नामांकित पुरस्कार सोहळ्यांमध्ये गोल्ड अवॉर्ड्सचं नाव आवर्जुन घेतलं जातं. यंदा हा पुरस्कार सोहळा थोडा हटके पद्धतीने आयोजित करण्यात आला असून यावेळी विजेत्यांची नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली जाणार आहेत. तसंच पुरस्कारांची कॅटेगरीमध्ये देखील बदल करण्यात आल्याचं गोल्ड अवॉर्डसचे सीईओ विकास कलांत्री यांनी ट्विट करुन सांगितलं.

यंदा या सोहळ्यामध्ये बेस्ट अभिनेता, बेस्ट अभिनेत्री या पुरस्कारांपेक्षा हटके कॅटेगरी करण्यात आली आहे. यात मोस्ट स्टायलिश स्टार, बेस्ट क्वारंटाइन शेफ, सेफ्टी फर्स्ट स्टार, सुपर कूल पेरेंट्स, मोस्ट एनर्जेटिक स्टार, होम स्वीट होम स्टार, मोस्ट इंटरॅक्टिव्ह स्टार, इन्टरटेनर फॅमिली, फिट अॅण्ड हेल्दी स्टार, माय ड्रीम स्टार, फन अॅण्ड फ्रेश कपल, ऑलवेज अवेलेबल स्टार, मोस्ट फोटोजेनिक स्टार, गो ऑन डेट स्टार, लॉकडाउन किंग अॅण्ड क्वीन अशी कॅटेगरी तयार करण्यात आली आहे.  विजेत्या कलाकारांची नावे १४ मे रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली जाणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदाच अशा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या पुरस्कार विजेत्यांची निवड चाहते आणि पॅनेलवरील सदस्य करणार आहेत.

दरम्यान, या पुरस्कार सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. विकास त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक कॅटेगरी शेअर करतात. ही कॅटेगरी पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं मत नोंदवत आहेत. यात विकास यांनी अलिकडेच मोस्ट एनर्जेटिक स्टार कोण? असा प्रश्न विचारल्यावर नेटकऱ्यांनी करण पटेल याला सर्वाधिक मत दिली आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 3:11 pm

Web Title: coronavirus lockdown gold quarantine awards coming soon on social media vikas kalantri ssj 93
Next Stories
1 ‘वो क्युँ उदास हो गई’; मदर्स डेसाठी आयुषमानचं खास गाणं
2 “आपल्या कमकुवत प्रशासनाकडे एकदा बघा”; औरंगाबाद दुर्घटनेवर संतापले प्रकाश राज
3 Family Man Season 2: जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार?, कोणता नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार?
Just Now!
X