25 October 2020

News Flash

दीपिका मध्यरात्री उठून करते ‘हे’ काम; लग्नाच्या दीड वर्षांनंतर रणवीरने केला खुलासा

काही दिवसांपूर्वीच दीपिकाने रणवीर क्वारंटाइनमध्ये घरी काय करतो हे सांगितलं होतं आणि आता...

रणवीरने केला खुलासा

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये २१ दिवसाच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. १४ एप्रिलपर्यंत असणाऱ्या या लॉकडाउनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. चित्रपट आणि मालिकांचे चित्रिकरणही थांबवण्यात आलं असल्याने अनेक कलाकार आपल्या घरीच आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. हे कलाकार घरी असताना म्हणजेच होम क्वारंटाइन असताना करत असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती त्यांच्या चाहत्यांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून देत असतात. अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंग क्वारंटाइनमध्ये काय करतो त्याबद्दलची माहिती दिली आहे. मात्र रणवीरने नुकत्याच इन्स्ताग्रामवर पोस्ट केलेल्या एका पोस्टमध्ये त्याची पत्नी म्हणजेच दीपिका मध्यरात्री उठून एक चमत्कारिक गोष्ट करते असं म्हटलं आहे.

क्वारंटाइनदरम्यान सोबत राहण्यासाठी रणवीर हा सर्वात उत्तम व्यक्ती आहे. तो दिवसातले २० तास झोपलेला असतो. त्यामुळे मला हव्या त्या गोष्टी घरात करता येतात,” असं काही दिवसापूर्वी दीपिकाने एका मुलाखतमध्ये सांगितलं होतं. “ज्या चार तासांमध्ये तो जागा असतो तेव्हा आम्ही एकत्र चित्रपट बघतो, जेवतो, गप्पा मारतो, व्यायाम करतो. अशावेळी त्याच्यासारखी व्यक्ती बरोबर असणं खरचं आनंददायी आहे. त्याच्या काहीही मागण्या नसतात, कटकट नसते. तो एकदम निवांत असतो,” असं दिपिकाने सांगितलं होतं. मात्र आता रणवीरने दीपिकाबद्दल एक खुलासा केला आहे आणि तो ही थेट सोशल नेटवर्किंगवर.

दीपिका आणि रणवीरला त्यांचे चाहते दिपवीर या नावाने हाक मारतात. १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ रोजी या दोघांचे लग्न झालं. त्यानंतर हे दोघेही आपआपल्या कामात व्यस्त झाले. अनेक ठिकाणी हे दोघे आपआपल्या वेळापत्रकाप्रमाणे चित्रिकरणासाठी, पुरस्कार सोहळ्यांसाठी फिरताना दिसले. अगदीच कधीतरी हे दोघे एकत्र दिसून आले. त्यामुळेच आता या लॉकडाउनच्या निमित्ताने दोघांना एकमेकांबरोबर बराच वेळ मिळाल्याचे चित्र दिसत आहे. हे दोघेही होम क्वारंटाइनमध्ये काय करत आहेत याबद्दलची माहिती ते आपल्या चाहत्यांना इन्स्ताग्रामवरुन देत आहेत. अनेकदा हे दोघे त्यांच्या सकाळच्या व्यायामाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात.

 

View this post on Instagram

 

Season 1:Episode 4 Two Two…ChaChaCha Productivity in the time of COVID-19! #exercise

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

काही दिवसांपूर्वीच दीपिकाने एका मुलाखतीमध्ये दोघे घरी वेळ कसा घालवतात यासंदर्भात माहिती दिली होती. याच मुलाखतीमध्ये पुढे बोलताना क्वारंटाइनच्या कळात आपल्याला भारतीय पद्धतीचे जेवण बनवायला शिकायचं आहे असंही दिपिकाने सांगितलं होतं. मात्र दीपिकाला एक कृत करताना रंगेहाथ पकडल्याचा फोटो रणवीरने पोस्ट केला आहे.

नक्की वाचा >> “रणवीर दिवसातले २० तास झोपलेला असतो, त्यामुळे…”; दीपिकाने सांगितली क्वारंटाइनची कथा

 

View this post on Instagram

 

Double the Endorphin-rush when She’s around! #homegymbuddies my #mondaymotivation @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

हे दोघेही क्वारंटाइनमध्ये असले तरी चाहत्यांबरोबर कनेक्टेड राहण्यासाठी सोशल नेटवर्किंगवरुन पोस्ट करत असतात. एक फोटो काही दिवसांपूर्वी रणवीरने शेअर केला होता ज्यामध्ये तो नटेला खाताना दिसत आहे. या फोटोला त्याने, “एक तो गया अब तेरा क्या होगा बाजीराव?” असं मजेदार कॅप्शन दिले होतं. असाच एक दीपिकाचा फोटो त्याने आता शेअर केला आहे. ज्या फोटोला १७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टमध्ये त्याने दीपिकाच्या एका सवयीबद्दलचा खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

Ek toh gaya ab tera kya hoga, Bajirao?

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

आता पुन्हा रणवीरने असाच एक फोटो शेअर केला असून त्याने आपल्या पत्नीबद्दलचं एक गुपित यामध्ये उघडं केलं आहे. दीपिकाला गोड खायला खूप आवडतं असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टबरोबर रणवीरने शेअर केलेल्या फोटोमध्ये नटेला स्पेडची छोटी बरणी दीपिकाच्या हातात दिसत आहे. त्यामधून ती मजा घेत घेत नटेला खाताना दिसत आहे. मात्र हा फोटो पोस्ट करताना या बरणीवरील खरं नाव हटवून त्याजागी रणवीरने ‘खिल्जी’ असं लिहीलं आहे. “रात्रीच्या अंधारात तिने खिल्जीला खाऊन टाकलं,” असं रणवीरने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. मी तिला रंगेहाथ पकडलं अशा पद्धतीचा हॅशटॅगही त्याने हा फोटो शेअर करताना वापरला आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावत’ चित्रपाटमध्ये या दोघांनी एकत्र काम केलं होतं. रणवीरने अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारली होती तर दीपिकाने राणी पद्मवतीची भूमिका साकारली होती. त्यावरुनच रणवीरने अशी मजेदार कॅप्शन दिली आहे.

 

View this post on Instagram

 

In the dead of the night, she devoured Khilji ! Revenge is sweet indeed ! #sneakysneaky #caughtintheact @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on


नक्की पाहा>>
 Video: बेडरुमसंदर्भातील प्रश्नावर रणवीरने असं काही उत्तर दिलं की दीपिकाही लाजली

दीपिका आणि रणवीर लवकरच ‘८३’ या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित या चित्रपटामध्ये रणवीरने तत्कालीन भारतीय कर्णधार कपील देव यांची भूमिका साकारली आहे. तर त्याच्या रियल लाइफ पत्नी चित्रपटामध्येही पत्नीच्याच भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 5:00 pm

Web Title: coronavirus lockdown ranveer singh crashed deepika padukones nutella moment scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 प्रिया-उमेशच्या ‘आणि काय हवं?’चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला
2 काम मिळवण्यासाठी जान्हवी करतेय अभिनेत्याला विनवणी
3 Lockdown : माधुरीची डान्स क्लासला हजेरी; लढवली भन्नाट शक्कल
Just Now!
X