News Flash

करोनामुळे घरी बसलेला सलमान पाहा काय करतोय?

घरी बसून सलमान दाखवतोय आपलं टॅलेंट

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील अनेक गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. अगदी देवस्थानांपासून चित्रपटांच्या चित्रीकरणापर्यंत सर्व काही बंद करण्यात आलं आहे. परिणामी अनेक मोठे सेलिब्रिटी आपल्या घरीच थांबले आहेत. चित्रपटाचं चित्रीकरण, प्रदर्शन, प्रमोशन असं कुठलंच काम त्यांच्याजवळ नाही. त्यामुळे आपली आवडती काम करुन ते आपला वेळ घालवत आहेत. दरम्यान बॉलिवूडचा भाईजान सलमान खान चित्र काढून आपलं टॅलेंट दाखवत आहे.

सलमानला चित्रकलेची खूप आवड आहे. अनेकदा तो रिकाम्या वेळेत चित्र काढत असतो. त्याने काढलेल्या चित्रांची त्याचे चाहते मंडळी खूप स्तुती करतात. करोना विषाणूमुळे घरी बसलेला भाईजान सध्या चित्रकलेच्या माध्यमातून आपला वेळ घालवत आहे. सलमानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो चित्र काढताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

काही तासांपूर्वी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमानच्या चाहत्यांनी तर त्याच्यावर कौतुकाचा वर्षावच केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 1:03 pm

Web Title: coronavirus pandemic salman khan enjoys sketching during self quarantine period mppg 94
Next Stories
1 तेरी फॅमिली को मार दूंगा अगर…,’बिग बॉस’ स्पर्धकाच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी
2 हा लोकप्रिय अभिनेता ठरला सर्वांत आकर्षक पुरूष
3 मुलांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी संगीतकाराने स्वत:ला केले काचेच्या पेटीत बंद
Just Now!
X