25 October 2020

News Flash

शाहरूख खानने जिंकलं मन, विलगीकरणासाठी ऑफिसची इमारत देण्याची ऑफर

शाहरुख खानने वांद्रे येथील आपली चार मजली कार्यालयीन इमारत विलगीकरणासाठी देण्यास तयार आहोत असं मुंबई महापालिकेला सांगितलं आहे

करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले असून विलगीकरणासाठी आपल्या कार्यालयाची इमारत देण्याची ऑफर महापालिकेला दिला आहे. शाहरुख खानने वांद्रे येथील आपली चार मजली कार्यालयीन इमारत विलगीकरणासाठी देण्यास तयार आहोत असं मुंबई महापालिकेला सांगितलं आहे. या ठिकाणी सर्व गरजेच्या वस्तूदेखील आहेत. शाहरुख खान आणि गौरी खानने मदतीचा हात पुढे केल्याने महापालिकेने त्यांचे आभार मानले आहेत.

शनिवारी महापालिकेने शाहरुख आणि गौरी खानचे आभार मानणारं ट्विट केलं. या ट्विटमध्ये महापालिकेने म्हटलं आहे की, “आपली चार मजली कार्यालयीन इमारत ज्यामध्ये महिला, लहान मुलं आणि वृद्धांसाठी गरजेच्या सर्व गोष्टी आहेत ती विलगीकरणासाठी देण्याची ऑफर दिल्याबद्दल शाहरुख आणि गौरी खानचे आभार”.

यााधी शाहरुख खानने २ एप्रिल रोजी करोनाशी लढा देण्यासाठी पुढाकार घेत मदत जाहीर केली होती. यावेळी त्यांनी आपल्या कंपन्या कोलकाता नाइट रायडर, रेड चिल्लीज एंटरटेनमेंट, मीर फाऊंडेशन आणि रेड चिल्लीज VFX डून सात संस्थांना निधी देत असल्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय ५० हजार पीपीई किट्ससाठी सरकारला निधी, मुंबईतील ५५०० कुटुंबाना तसंच १० हजार लोकांना जेवण, रुग्णालयांसाठी २००० जणांचं जेवण, दिल्लीतील २५०० रोजंदारी कामगार आणि १०० अॅसिड हल्ला पीडितांना किराणा सामान इतकी मदत शाहरुखने जाहीर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 2:49 pm

Web Title: coronavirus shahrukh khan offered office building for quarantine facilities sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 शाहरुखचा आदर्श ठरला ‘लाख’मोलाचा; फॅन पेजने केली आर्थिक मदत
2 एकता कपूर स्वत:चा वर्षभराचा पगार देणार ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या कर्मचाऱ्यांना
3 डॅनी व परवीन बाबी चार वर्षे एकत्र होते पण…
Just Now!
X