News Flash

घरात फूटबॉल खेळणाऱ्या पतीची पत्नीने केली धुलाई; अभिनेत्रीनं पोस्ट केला व्हिडीओ

घरात फूटबॉल खेळणं पतीला पडलं महाग; झाली धुलाई

करोना विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी जगभरातील लोकांनी स्वत:ला घरात अक्षरश: कोंडून घेतलं आहे. परंतु अनेक दिवस काहीही न करता घरात शांत बसणं काही सोपं नसतं. बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक पत्नी आपल्या पतीची धुलाई करताना दिसत आहे.

पत्नीने का केली पतीची धुलाई?

व्हिडीओत दाखवलेले पती-पत्नी करोना विषाणूमुळे घरात थांबले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून हे जोडपं घराबाहेर पडलेलं नाही. त्यामुळे स्वत:चा वेळ घालण्यासाठी पतीने घरात फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. खेळता खेळता तो स्वयंपाकगृहात पोहोचला. तिथे त्याने बॉलला लाथ मारली आणि स्वयंपाकगृहातील भांडी पाडली. या प्रकारामुळे पतीवर वैतागलेल्या पत्नीने त्याची चांगलीच धुलाई केली.

७०-८०च्या दशकात आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या सिमी गरेवाल सध्या सिनेसृष्टीत कार्यरत नाहीत. मात्र सोशल मीडियाव्दारे त्या आपल्या चाहत्यांच्या संपर्कात कायम असतात. देशभरातील लोकांनी करोना विषाणूमुळे स्वत:ला जणू घरात कोंडूनच घेतले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 6:22 pm

Web Title: coronavirus simi garewal share video husband gets beaten by wife mppg 94
Next Stories
1 Video : या १४ लोकांना करोना म्हणजे काय हेच माहिती नाही, कळताच अशी होती प्रतिक्रिया
2 Coronavirus : ढिंच्यॅक पूजाचं ‘करोना’वर गाणं, नेटकऱ्यांनी लावला डोक्याला हात
3 Video: टिक टॉकवर ‘अमिताभ’चा व्हिडिओ व्हायरल; २४ तासांत २० लाख लोकांनी पाहिला
Just Now!
X