08 March 2021

News Flash

… म्हणून देवोलीनाला करण्यात आलं होम क्वारंटाईन

तिची इमारत सील करण्यात आली आहे.

संपूर्ण जगात करोना व्हायरची भीती पाहायला मिळते. अशातच सर्वजण स्वत:ला करोना होणार नाहीना यासाठी काळजी घेत आहेत. बॉलिवूड कलाकारांनी तर घराबाहेर पडणे टाळले आहे. पण आता बिग बॉस पर्व १३मधील स्पर्धक देवोलीना भट्टाचार्जी हिच्या इमारतीमधील व्यक्तीला करोना झाला असल्याचे समोर आले आहे.

देवोलीनाच्या इमारतीमधील एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे त्यांची इमारत सील करण्यात आली आहे. पण करोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या घरी काम करणारा व्यक्ती देवोलीनाच्या घरातही काम करत होता. त्यामुळे देवोलीना आणि तिच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीला चौदा दिवस क्वारंटाइन केले आहे.

आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने ‘मला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे आणि माझ्या हातावर क्वारंटाइनचा शिंका देखील आहे. मी १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये आहे. मी कुठे जाऊ शकत नाही आणि सध्या मी मुंबईत एकटी आहे. माझी आई आणि भाऊ आसाममध्ये आहे. मी प्रार्थना करते की सगळं लवरक ठिक होऊ दे. येत्या १४ दिवसांमध्ये मला करोनाची काही लक्षणे जाणवली तर मी चाचणी करुन घेईन’ असे देवोलीनाने म्हटले.

देवोलीना मुंबईमधील गोरेगाव येथे राहते. तिच्या सोबत तिची आई आणि भाऊ राहतात. पण लॉकडाउनमुळे तिची आई आणि भाऊ आसाममध्ये अडकले आहेत. सध्या एकटी असल्यामुळे तिला या कठिण काळात सर्व स्वत:च करावा लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 12:44 pm

Web Title: coronavirus tv actress devoleena bhattacharjee in home quarantine avb 95
Next Stories
1 “बॉलिवूडमध्ये कोणीही जबरदस्ती करत नाही”; अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव
2 सात रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास दिला नकार; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
3 दीपिका-रणवीर लवकरच देणार गोड बातमी?; दीपिकाने पोस्ट केलेल्या फोटोवरुन चर्चांना उधाण
Just Now!
X