27 May 2020

News Flash

करोनाविरुद्धच्या लढ्यात ‘झी’ची साथ; ५ हजार मजुरांना करणार आर्थिक मदत

लॉकडाउनचा सर्वाधिक फटका कामगारांना बसत आहे

देशात लॉकडाउन सुरु असल्यामुळे अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळेच रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना अनेक संकटांना सामोरं जाव लागत आहे. याचकारणास्तव अशा गरजूंसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्येच झी एन्टरटेमेंटनेदेखील या मदतीचा हात पुढे करत ५ हजार मजुरांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रसार माध्यम आणि करमणूक या क्षेत्रामधील झी एन्टरटेमेंट ही मोठी कंपनी असून या कंपनीत असंख्य कर्मचारी काम करतात. त्यापैकी या कंपनीसाठी रोजंदारीवर काम करणाऱ्या जवळपास ५ हजार मजुरांना ही कंपनी आर्थिक मदत करणार आहे.करोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आलं आहे. याचा सर्वाधिक फटका या कामगारांना बसत आहे. अशावेळी माध्यम व करमणूक क्षेत्रातील जबाबदार कंपनी या नात्याने सध्याच्या प्रतिकूल काळात  कामगारांना मदत करण्याचे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून ‘झी’ने हा निर्णय घेतला आहे.

PM Cares Fund च्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने ‘झी’ने त्याच्या देश-विदेशातील माध्यम प्रणालीचा उपयोग करुन १.३ अब्ज नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केलं आहे. त्यासोबतच त्यांनी झी नेटवर्कमध्ये काम करणाऱ्या ३५०० कर्मचाऱ्यांनी PM Cares Fund मध्ये स्वत:हून मदत करण्याची संधीही कंपनीच्या अंतर्गत प्रणालीद्वारे मिळवून दिली आहे. या योजनेअंतर्गत कंपनीतील कर्मचारी मिळून जेवढी रक्कम जमा करतील, तेवढ्याच रक्कमेची भर कंपनी या फंडात जमा करणार आहे. त्यानंतर हा संपूर्ण निधी पीएम-केअर्स फंडमध्ये जमा करण्यात येणार आहेत. ही माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत गोयंका यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.


‘आमच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व रोजंदारी कामगारांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने एकत्र येऊन लढा देणे, हाच आमचा मंत्र आहे. सध्याच्या बिकट परिस्थितीत भारतीय उद्योग क्षेत्राने एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय कार्यास हातभार लावण्याची आवश्यकता आहे. या कार्यास अर्थसाह्य करण्याबरोबरच देशव्यापी जनजागृती करण्याचे आमचे नियोजन आहे. देशात आणि परदेशांतही आमची व्याप्ती लक्षात घेता, आम्ही दर्शकांना या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत. सर्व देशाने एक कुटुंब म्हणून एकत्र येण्याची हीच खरी वेळ आहे,’ असं पुनीत गोयंका म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 4:05 pm

Web Title: coronavirus zee company commits to offer financial relief to 5000 daily wage earners ssj 93
Next Stories
1 आयुषमानने असं केलं विश की चाहताही झाला खुश; व्हिडीओ होतोय व्हायरल
2 ही होती रामायणातील हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या दारा सिंह यांची शेवटची इच्छा
3 ‘रामा’चं ट्विटरवर फेक अकाऊंट; खुद्द मोदीही फसले
Just Now!
X