15 October 2019

News Flash

दीपिकाच्या पासपोर्ट कव्हरची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

निळ्या रंगाची ही केस असून तिची किंमत ऐकून सामान्य माणूस नक्कीच थक्क होईल.

दीपिका पदुकाेण

संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या ‘कान्स चित्रपट महोत्सवा’साठी बॉलिवू़ड अभिनेत्री सज्ज झाल्या आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण सुद्धा ‘कान्स’साठी रवाना झाली आहे. दीपिकाला ‘कान्स’मध्ये बघण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.दीपिकाने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर बोर्डिंग पासचा फोटो शेअर केला असून त्यावरून असं दिसून येतंय की ही अभिनेत्री लंडनहून ‘कान्स’साठी रवाना झाली आहे.

दीपिकाने शेअर केलेल्या फोटोमधून अजून एक खास गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे तिच्या पासपोर्टचे कव्हर.दीपिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे पासपोर्ट कव्हर ठळकपणे दिसत आहे. ‘गोयार्ड क्रिएशन’चे हे कव्हर असून हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे. निळ्या रंगाची ही केस असून तिची किंमत ऐकून सामान्य माणूस नक्कीच अवाक होईल. दीपिकाच्या या पासपोर्ट कव्हरची किंमत ७५५ डॉलर म्हणजेच ५२,९३६ रुपये आहे.

दीपिका ‘कान्स’मध्ये काय कपडे परिधान करणार आहे याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचं लक्ष वेधलेलं आहे. ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे हे ७२वे वर्ष आहे.हा महोत्सव १४ मे रोजी सुरू झाला असून २५ मे रोजी संपणार आहे.देशभरातील प्रसिद्ध कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

First Published on May 16, 2019 7:35 pm

Web Title: cost of deepika padukones passportcase