News Flash

लॉकडाउननंतर ‘हे’ कलाकार अडकणार लग्न बंधानात

जाणून घेऊया या कलाकारांबद्दल.

सध्या संपूर्ण देशात करोना व्हायरसने थैमान घातला आहे. त्यामुळे सर्वजण घरात अडकून पडले आहेत. याला बॉलिवूडमधील कलाकारही अपवाद नाहीत. लॉकडाउनमुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच करोना व्हायरसमुळे अनेकांचे विवाह सोहळे देखील पुढे ढकलण्यात आले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या लग्नाचे प्लॅनिंग केले होते. पण लॉकडाउनमुळे त्यांना ते पुढे ढकलावे लागले आहे. चला जाणून घेऊया या कलाकारांबद्दल…

अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर गेल्या कित्येक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणाही केली होती. लॉकडाउन संपल्यावर हे कपल लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालमुळे चर्चेत आहे. चाहते त्यांच्या लग्नासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. वरुणच्या वाढदिवशी साखरपूडा होणार असल्याचे म्हटले जात होते. पण लॉकडाउनमुळे आता त्याचे लग्न पुढे ढकलण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

‘बाहुबली’मधील भल्लालदेव म्हणजेच लोकप्रिय अभिनेता राणा डग्गूबतीने नुकताच गर्लफ्रेंड मिहिका बजाजने लग्नासाठी होकार दिल्याचे म्हटले आहे. दोघेही लवकरच साखरपूडा करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. हे कपल लॉकडाउननंतर लग्न बंधनात अडकू शकतात असे म्हटले जात आहे.

बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यंदा लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. लॉकडाउन संपताच त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण ऋषि कपूर यांच्या निधननानंतर हे कपल कधी लग्नबंधनात अडकणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल एप्रिल महिन्यात लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. पण लॉकडाउनमुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 8:23 pm

Web Title: couples who will get married after coronavirus lockdown avb 95 2
Next Stories
1 हे काम मोदींपेक्षा चांगलं कुणीच करू शकत नाही; अभिनेत्यानं पंतप्रधानांना ठोकला सॅल्युट
2 जाणून घ्या सोनम आणि मिहीकामध्ये काय आहे नातं
3 लॉकडाउननंतर ‘हे’ कलाकार अडकणार लग्न बंधानात?
Just Now!
X